देश

मोदींनी ध्यानधारणा केलेल्या गुहेत राहण्यासाठी तुम्हीही करु शकता बुकींग; त्यासाठी मोजावे लागतील ‘एवढे’ पैसे!

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथच्या मंदिरात पोहचले. मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावरील एका गुहेत त्यांनी तब्बल 17 तास तपश्चर्या केली.

ही गुहा केदारनाथ मंदिरापासून 1 किलोमीटर लांब आहे. या गुहेमध्ये पलंग, वीज, टेलिफोन आणि शौचायल इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. शिवाय या गुहेत सकाळचा नाश्ता, चहा, दुपार-रात्रीच्या जेवणाचीही सोय आहे.

गुहेत एक घंटी पण लावण्यात आली आहे जेणेकरुन काही आपातकालीन परिस्थितीत साथीदारांना बोलवता येऊ शकतं. मोदी जेव्हा गुहेत होते तेव्हा त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेराही लावण्यात आला होता.

या गुहेत राहण्यासाठी तुम्हीही बुकींग करु शकता. सर्वसामान्य व्यक्तीला एक दिवसासाठी 990 रुपये मोजावे लागतील. पण तुम्ही या गुहेत 3 दिवसापेक्षा जास्त दिवस बुकींग करता येणार नाही.

महत्वाच्या बातम्या

-राजधानी दिल्लीतील लोकसभेच्या जागांसंदर्भात अरविंद केजरीवाल यांचं मोठं वक्तव्य

मोदी-ममता संघर्ष अजूनही सुरूच; मोदींच्या दौऱ्यातून आचारसंहिता भंगाचा तृणमूलचा आरोप

-चंद्राबाबू नायडू आणि तुमच्यात काय बोलणं झालं?? पवार म्हणतात…

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे आमदार मुनीरत्न यांच्या घराजवळ बॉम्बस्फोट

-पश्चिम बंगालमध्ये राडा; भाजप कार्यकर्त्यावर धारदार शस्त्राने हल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या