Loading...

सुषमा स्वराज लोकांचा कसा विचार करायच्या; नरेंद्र मोदींनी सांगितलं उदाहरण

नवी दिल्ली | देश- विदेशात अडकलेल्या लोकांची सुषमाजींनी तातडीने मदत केली. संकटात लोकांना आधार दिला, सुषमाजींनी परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘प्रोटोकाॅल’ला ‘पीपल्स काॅल’मध्ये बदललं. परराष्ट्र खात्याला थेट लोकांशी जोडलं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा आयोजित केली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते.

Loading...

ट्वीटरवर आलेल्या तक्रारींचीही गंभीर दखल घेत सुषमाजींनी लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. अडचणीच्या काळात ज्यांनी कुणी मदत मागितली त्यांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या, असं म्हणत त्यांनी सुषमा स्वराज यांच्याबद्दलच्या आठवणी जागवल्या.

दरम्यान, त्यांना जे खातं मिळालं त्यांनी त्याची कार्यपद्धती बदलून टाकली. त्या आमच्यासाठी प्रेरणा स्त्रोत होत्या, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-सुषमा स्वराज यांच्याकडून मला खूप शिकायला मिळालं; नरेंद्र मोदी भावूक

-मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेच्या वेळापत्रकात पूरस्थितीमुळे बदल

-“जनाची नाही मनाची असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्या 2 मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत”

Loading...

-“केंद्रात, राज्यात आणि कर्नाटकातही भाजपचंच सरकार तरी पाणी सोडलं नाही”

-वंचितचं निवडणूक चिन्ह ठरलं; कुणाला ठेवणार ‘ग‌ॅस’वर??

Loading...