Loading...

सुषमा स्वराज यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक

नवी दिल्ली |  सुषमा स्वराज्य यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं. त्या मितभाषी होत्या तश्याच त्या जबाबदार आणि प्रसंगी कठोर बोलणाऱ्या होत्या, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भाजपने दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

सुषमाजी आपल्या मतावर ठाम राहण्याचा प्रयत्न करायच्या. त्या आपल्या कामाशी प्रामाणिक होत्या. त्यांच्या कामाने मला अनेकदा प्रेरणा मिळायची, अशा शब्दात मोदींनी स्वराज यांच्या कामाला अधोरेकित केलं.

Loading...

जबाबदारी काहीही असली तरी त्यांचा रोखठोक बोलण्याचा स्वभाव होता. सुषमाजींनी प्रोटोकॉलची भाषा बदलली. जगातील कुठल्याही कोपऱ्यातील भारतीय नागरिकाला मदत करण्यासाठी त्या नेहमी आतुर असायच्या, असं ते म्हणाले.

दरम्यान, या शोकसभेला भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी अमित शहांनी देखील सुषमा स्वराज यांच्या कामाची महती सांगितली.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेच्या वेळापत्रकात पूरस्थितीमुळे बदल

-“जनाची नाही मनाची असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्या 2 मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत”

-“केंद्रात, राज्यात आणि कर्नाटकातही भाजपचंच सरकार तरी पाणी सोडलं नाही”

Loading...

-वंचितचं निवडणूक चिन्ह ठरलं; कुणाला ठेवणार ‘ग‌ॅस’वर??

-प्रतीक्षा संपली…! बहुचर्चित ‘पळशीची पीटी’ सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Loading...