कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळेनं जिंकलं भारतीयांचं मन; PM मोदी खास पोस्ट करत म्हणाले..

Swapnil Kusale | पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील स्वप्निल कुसळे याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात आज चमकदार कामगिरी करत भारताला (Swapnil Kusale) तिसरं पदक मिळवून दिलं आहे.

स्वप्निल भारताला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवून देणारा खाशाबा जाधव यांच्यानंतरचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. या कामगिरीनंतर कोल्हापूर येथे एकच जल्लोष करण्यात आला.या स्पर्धेत (Paris Olympics 2024) स्वप्निलने एकुण 451.4 गुण प्राप्त केले.

स्वप्नीलच्या या कामगिरीनंतर त्याचं सर्वच स्तरातून अभिनंदन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत स्वप्निलचं अभिनंदन केलं आहे. आज प्रत्येक भारतीय आनंदाने भरलेला आहे, असं मोदी म्हणाले आहेत.

पंतप्रधान मोदी यांची खास पोस्ट-

“स्वप्निल कुसळेची अप्रतिम कामगिरी! स्वप्निलचं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या 50मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्याचं अभिनंदन. त्याची कामगिरी विशेष आहे. कारण त्याने कौशल्य दाखवले आहे. तसेच या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. प्रत्येक भारतीय आनंदाने भरलेला आहे”, अशा शब्दात (Swapnil Kusale) पंतप्रधानांनी स्वप्निलचं अभिनंदन केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्वप्निलचे कौतुक केले आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील नेमबाजी खेळातील पुरुष 50 मी. रायफल थ्री पोझिशन विभागात स्वप्नील कुसाळे या कोल्हापूरच्या नेमबाजाने कांस्य पदकावर मोहोर उमटवून संपादन केलेल्या उत्तुंग यशामुळे देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.स्वप्नील हा महाराष्ट्राचा सुपुत्र आहे ही बाब महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

स्वप्निल कुसळे हा महाराष्ट्राचा सुपुत्र असून तो कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील रहिवासी आहे. तो 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आता 12 वर्षांच्या (Paris Olympics 2024) प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर स्वप्निल कुसळेने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करत विजयी कामगिरी (Swapnil Kusale) केली.

News Title- pm narendra modi congratulated swapnil kusale

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्राच्या सुपुत्राची ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी; भारताला तिसरं पदक

मुंबईकरांनो काळजी घ्या! डेंग्यू, मलेरियासह ‘या’ आजारांचा धोका वाढला

पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत मिळणार मोठी जबाबदारी?

महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; LPG सिलेंडरच्या किंमतीत वाढ