बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“रात्री 50 मिनिटं व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होतं मात्र बंगालमध्ये गेल्या 50 वर्षापासून विकास डाऊन”

नवी दिल्ली | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि तृणमूल पक्षांंच्या प्रचारसभांना जोरदार वेग आला आहे. वेगवेगळ्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे नेते आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी सभा घेत आहेत. अशातच खडगपूर येथे झालेल्या एका सभेत नरेंद्र मोदींनी शुक्रवारी व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याचा धागा पकडत ममता बॅनर्जींवर टीका केली आहेे.

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम 50 ते 55 मिनिटांसाठी डाऊन झालं होतं. अनेक जण यामुळे चिंतेत होते. जवळजवळ तासभर त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. बंगालमध्ये विकास, लोकांची स्वप्न आणि सरकारवरील विश्वास हे सगळं गेल्या 50 ते 55 वर्षांपासून डाऊन झालं असल्याचं म्हणत मोदींनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला.

बंगालच्या जनतेने काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष या सर्वांना संधी दिली आहे. आता तुम्ही भाजपला संधी दिलीत तर खरं परिवर्तन कसं असतं हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना मोदींनी तरूणांच्या विषयावरून ममतांवर टीका केली आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी सरकार राष्ट्रीय शिक्षण योजनाची अमलबजावणी करण्यास नकार देत आहे. त्यांना बंगालमधील तरुणांच्या भविष्याची चिंता नाही. दीदींना बंगालमधील तरुणांच्या भविष्यासोबत खेळू देणार नसल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या- 

‘कोरोना रुग्णामागे मिळणारे दीड लाख बंद झाले म्हणून…’; ‘या’ मराठी अभिनेत्रीने केला संताप व्यक्त

मास्क नाही घातलं म्हणून केली चौकशी, चिडलेल्या महिलेने केली पालिका कर्मचारिकेची पिटाई, पाहा व्हिडीओ

जॉन अब्राहमवर आली सिनेमाची तिकीटं विकण्याची वेळ, पाहा व्हिडिओ

“मिस्बाह-उल-हक म्हणजे गरीबाचा एम.एस. धोनी”

कोरोना झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारेे असणार विशेष परीक्षेचं आयोजन, जाणून घ्या!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More