काँग्रेसने मला 12 वर्षे छळण्याचा प्रयत्न केला- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली |  गुजरातचा मुख्यमंत्री असताना काँग्रेसने मला सतत 12 वर्षे छळण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला आहे.

रामलीला मैदानात भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन चालू आहे. त्या राष्ट्रीय परिषदेत मोदी बोलत होते.

नॅशनल हेराल्ड प्रकरण 2012 पासून चालू आहे. काँग्रेसला जमीन, इन्कम टॅक्सची माहिती  कोणालाही कळू द्यायचे नव्हती. त्यामुळे त्यांनी तपासातसुद्धा सहकार्य केले नाही, असाही आरोप त्यांनी काँग्रेसवर केला आहे.

दरम्यान,काँग्रेसच्या काळात अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे बाहेर आले. मात्र, सरकार भ्रष्टाचाराशिवाय चालू शकतं हे भाजपनं सिद्ध केलं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-सिडनी एकदिवसीय सामन्यात नोंदवलेले ‘हे’ 9 विक्रम तुम्ही वाचाच!

-…अन्यथा उत्तर प्रदेशात आम्ही स्वबळावर लढू!- काँग्रेस

-…जेव्हा DRS भारतीय संघाला महागात पडतो आणि भारताचा पराभव होतो!

-…तर अजित दादांना पहिली सही ‘सिंदखेडराजा’च्या विकासनिधीवर करायला लावेन- सुप्रिया सुळे

-ऑस्ट्रेलियन कसाेटी कर्णधाराकडून धोनीचं तोंडभरुन कौतुक!