पराभव दिसू लागताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सूर नरमला; पाहा व्हीडिओ-

पराभव दिसू लागताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सूर नरमला; पाहा व्हीडिओ-

नवी दिल्ली | पाच राज्याच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना सूर नरमल्याचं दिसत आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी त्यांनी दिलेली प्रतिक्रिया यासंदर्भात पुरेशी बोलकी आहे. 

संसदेच्या या अधिवेशनात जनहिताचे महत्त्वपूर्ण प्रश्न मांडले जातील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सगळ्यांनीच अधिक काळ काम करायची तयारी ठेवा. जेणेकरून महत्त्वपूर्ण कामकाज पूर्णत्वाला नेता येईल, असं मोदी म्हणाले. 

मला आशा आहे की संसदेतील सर्व खासदार जनहिताच्या निर्णयांचं भान ठेवून कामकाज करतील. प्रत्येक मुद्दयावर चर्चा व्हावी, हाच आमचा प्रयत्न असेल, असं ते म्हणाले. 

दरम्यान, 5 राज्यांच्या निकालामध्ये भाजपला मोठा फटका बसताना दिसत आहे. या निकालांवर बोलणं मात्र त्यांनी टाळलं. 

महत्वाच्या बातम्या –

-मिझोरमनं ‘हात’ झटकला; काँग्रेस सत्तेवरुन पायउतार होणार?

धनुष्यबाणाचं बटन दाबलं, मत कमळाला गेलं; गोटेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मोदींना आणखी एक धक्का; पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार डॉ. सुरजीत भल्लांचा राजीनामा

-भाजपची नौका बुडत असल्याचं दिसताच शेअर बाजाराला पुन्हा मोठे हादरे

-भाजपला सर्वात मोठा धक्का; 3 राज्यांमध्ये सत्ता जाण्याची शक्यता

Google+ Linkedin