प्रणवदांनी मला मुलासारखी वागणूक दिली, मोदी भावूक

नवी दिल्ली | राष्ट्रपती प्रणव मुखर्जी एखादा पिता आपल्या मुलाची जशी काळजी घेतो तसं जपलं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यावेळी ते भावूक झालेले पहायला मिळाले. 

 ‘प्रेसिडंट प्रणव मुखर्जी: ए स्टेट्समन’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी ते बोलत होते.

मी खूप नशीबवान आहे, कारण मला पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच प्रणवदांची साथ मिळाली. वैचारिक मतभेद त्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानपदाच्या मध्ये येऊ दिले नाहीत, असंही मोदी यावेळी म्हणाले.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या