नवी दिल्ली | जनऔषधी योजनेचा लाभ मिळालेल्या रुग्णांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. मोदींना आपल्या डोळ्यातील अश्रू रोखणं कठीण झालं होतं.
‘मी ईश्वराला पाहिलं नाही, पण मोदीजी मी तुम्हाला पाहिलंय’… एका महिलेचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले इतकंच नाही तर त्यांना अश्रू आवरणंही कठिण झालं. जन औषधांमुळेच आज माझी प्रकृती सुधारत चाललीय आणि खर्चही कमी झालाय, असं या महिलेनं पंतप्रधान मोदींशी संवाद साधताना म्हटलं. दीपा शाह असं महिलेचं नाव आहे.
2011 साली मला अर्धांगवायूचा झटका आला होता. यामुळे मला नीटसं बोलताही येत नव्हतं. यावर जे उपचार सुरू होते ते खूप महागडे होते. त्यामुळे घर चालवणंही कठिण जात होतं. पण जन औषधी (जेनरिक) घेणं सुरू केलं आणि पैसेही वाचले, असं शाह यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, तुमची ध्येयासक्ती हीच तुमचा देव आहे, तुम्ही आजारपणाला पराभूत केलंय, असं म्हणत मोदींनी पीडित रुग्ण महिलेचा आत्मविश्वास बळकट केला. सध्या मोदींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
This is Gold. PM Modi in tears after hearing the story of a beneficiary on Jan Aushadi Day. She says “I haven’t seen God. But I see God in you” pic.twitter.com/xD9XkPS7CF
— Omkar Shetty🇮🇳 (@omkar_shettyg) March 7, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“आम्ही सरड्यासारखे रंग बदलत नाही”
कलयुगात महाभारत आणि रामायण एकत्र बघायचा योग आला- निलेश राणे
महत्वाच्या बातम्या-
ठाकरे सरकारच्या 100 दिवसांचा लेखाजोखा पाहा 111 सेकंदात; पाहा व्हिडीओ
YES बॅंकेवर निर्बंध येण्याआधी गुजरातच्या कंपनीनं काढले 265 कोटी!
सध्या देशात सुरु असलेला हिंसाचार पाहून दु:ख वाटतं- गुलजार
Comments are closed.