बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्ली शांत करण्याची जबाबदारी मोदी-शहांनी सोपवली ‘या’ व्यक्तीवर

नवी दिल्ली | दिल्ली येथील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावर जबाबदारी सोपावली आहे. डोभाल दिल्लीच्या सर्व परिस्थितीची संपूर्ण माहिती घेऊन मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना देणार आहेत.

अजित डोभाल यांनी रात्री दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक आणि विशेष आयुक्त श्रीवास्तव यांच्यासोबत जाऊन जाफराबाद, सीलमपूर या हिंसक विभागाचा दौरा केला. यावेळी डोभाल यांनी स्थानिकांशी चर्चा केली.

पोलीस अधिकाऱ्यांसोबत डोभाल यांनी मीटिंग घेतली. त्यात हिंसा झाल्यास कडक कारवाई करा. पर्यायी पोलीस आणि निमलष्कर बल तैनात केले जातील, असंही डोभाल यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, इशान्य दिल्लीमध्ये नारिकत्व सुधारणा कायदा  विरोधी हिंसाचारामध्ये आज सकाळपर्यंत 20 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती कळतंय.

ट्रेंडिंग बातम्या- 

बांगड्या घालण्याच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना जोरदार प्रत्युतर

शिवसेनेच्या हिंदुत्वाची परिक्षा!; सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजप आक्रमक

महत्वाच्या बातम्या- 

सावरकरांचा गौरव प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला

तुकाराम मुंडेंची धडक कारवाई; कुख्यात गुंडाच्या आलिशान बंगल्यावर हातोडा

दिल्लीतील हिंसाचारामुळे सीबीएसईच्या परीक्षा पुढे ढकलल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More