Loading...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील सर्व मुद्दे एकाच ठिकाणी

-देशातील अनेक भागात पूरग्रस्तस्थिती आहे, मी त्यांचं सांत्वन करतो, राज्य सरकारांनी जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत

-देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान, योगदान देणाऱ्या सर्वांना नमन करतो

Loading...

-कलम 370 आणि कलम 35 अ हटणं हे सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे

-फक्त 10 दिवसात सरकारने देशहिताची पावलं उचलली

Loading...

-जर 2014 ते 2019 हा गरजांचा पूर्तता करण्याचा काळ होता, तर 2019 नंतरचा काळ हा देशवासियांच्या आकांक्षा, स्वप्न पूर्ण करण्याचा कालखंड आहे

– ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र घेऊन आम्ही चाललो होतो, पण 5 वर्षातच देशवासियांनी ‘सबका विश्वास’च्या रंगाने संपूर्ण वातावरण रंगवलं

-आम्ही अडचणी टाळत नाही किंवा कुरवाळत बसत नाही, अशी या सरकारची ओळख आहे. जे काम मागील 70 वर्षात झालं नाही ते 70 दिवसात झालं

-आज देश अभिमानाने सांगू शकतो की, ‘वन नेशन, वन कॉन्स्टिट्यूशन’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Loading...

-भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन : “कलम 370 हटवल्यानंतर आज भारत गर्वाने म्हणू शकतो, वन नेशन वन कॉन्स्टिट्युशन”

-येत्या काळात ‘जल जीवन मिशन’ सुरु करुन प्रत्येक घरात पिण्याच्या पाणी देण्याचा प्रयत्न, साडेतीन लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम या मिशनसाठी तरतूद केली जाईल.

-भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन : केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित काम करुन साडेतीन लाख करोडपेक्षा जास्त रक्कम जलजीवन मिशनसाठी वापरणार

-वाढती लोकसंख्या हे देशासमोरचं मोठं आव्हान आहे, छोटं कुटुंब म्हणजे देशभक्तीचं कार्य, छोट्या कुटुंबामुळे विकासाला चालना मिळते

-भारताच्या वाढत्या लोकसंख्येवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं बोट, वाढती लोकसंख्या हे देशासमोरील मोठं आव्हान

-सरकारने हळूहळू लोकांच्या आयुष्यातून बाहेर पडावं, साथीदार म्हणून पाठीशी राहिलं पाहिजे, जेणेकरुन ते स्वातंत्र्याने जगू शकतील. सरकारचा दबाव नसावा, किंवा सरकारचा अभाव नसावा

-मी दरदिवशी एक कायदा रद्द केला, 1450 कायदे रद्द केले आहेत, ही स्वतंत्र भारताची आवश्यकता होती

-देशाला नव्या उंचीवर नेऊन ठेवायचं आहे, जगात आपलं स्थान प्रस्थापित करायचं आहे, पहिल्यांदा लोक विचारायचे पक्के रस्ते कधी होणार, आता 4-8 पदरी हायवे कधी बनणार, असं विचारतात

-‘एक देश, एक संविधान’नंतर आता ‘एक देश, एक निवडणूक’वर विचार करण्याची वेळ

-काही देश केवळ भारतालाच नाही तर आजूबाजूच्या अनेक देशांना दहशतवादाने उद्ध्वस्त करत आहे. बांगलादेश आणि श्रीलंकाही दहशतवादाचा सामना करत आहेत

-तिन्ही सुरक्षा दलांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद नव्याने निर्माण करणार

-प्लास्टिकमुक्तीसाठी अभियान सुरु करणं गरजेचं, दुकानांमध्ये प्लास्टिक पिशवी न मागण्याचं बोर्ड लावावा

-तुम्ही लक्ष्य ठेवा की, 2022 पर्यंत देशातील कमीत कमी 15 पर्यटन स्थळांना भेट देऊन भारतीय संस्कृतीच विविधता पाहा

Loading...