बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

PM नरेंद्र मोदींच्या हस्ते गरीब कल्याण योजनेचा शुभारंभ; ‘या’ लोकांना मिळणार फायदा!

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गरीब कल्याण योजनेचा शुभारंभ झाला. 50 हजार कोटींची असणारी ही योजना लॉकडाऊनमध्ये घरी पोहोचलेल्या मजूरांसाठी महत्त्वाची आहे. या योजने अंतर्गत 25 हजार प्रवासी मजुरांच्या हाताला काम मिळणार आहे.

मुख्यमंत्री नितिश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फन्सिंगच्या माध्यमातून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. खगडिया जिल्ह्यातील तेलिहार गावातून ही योजना सुरु करण्यात आली आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर गावी पोहोचलेल्या मजूरांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. 18 जूनला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. प्रवासी मजुरांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे हे या योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचं सीतारमन यांनी सांगितलं होतं.

लॉकडाऊनमध्ये बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा आणि राजस्थान या राज्यांमध्ये सर्वाधिक मजूर परतले आहेत. या राज्यांमधील सुमारे 116 जिल्ह्यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. या मजुरांसाठी या योजनेतून रोजगार उपलब्ध करता येईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या होत्या.

गरीब कल्याण योजनेअंतर्गत 25 क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जाणार आहेत. ज्यामध्ये ग्रामपंचायत भवन, विहिरींचे बांधकाम, अंगणवाडी, राष्ट्रीय महामार्गांची कामे अशा स्वरुपाच्या तब्बल 25 क्षेत्रांचा समावेश आहे.

125 दिवसांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. 116 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरु करण्याचा सरकारची योजना आहे. जल जीवन मिशन, ग्राम सडक योजना यांसारख्या योजनांमध्ये प्रवासी मजूरांना देखील संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

कोणत्या राज्यांना किती फायदा?-

बिहारच्या 32, उत्तर प्रदेशच्या 31, मध्य प्रदेशच्या 24, राजस्थानच्या 22, ओडिशातील 4, झारखंडच्या 3 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरु करण्यात येणार आहे. बिहारमधून या योजनेचा शुभारंभ झाला असून लवकरच इतर राज्यांमध्ये देखील तिचा विस्तार केला जाणार आहे.

गरीब कल्याण योजनेत ‘ही’ कामे करावी लागणार-

1. सार्वजनिक परिसराची स्वच्छता
2. ग्रामपंचायत भवनाचं काम
3. गावातील सार्वजनिक कामे
4. राष्ट्रीय महामार्गाची कामे
5. जलसंधारण आणि जलसंचयाची कामे

6. विहिरींचं बांधकाम
7. वृक्षारोपणाची कामे
8. बागकाम
9. अंगणवाडी केंद्रांची कामं
10. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची कामं

11. ग्रामीण रस्ता आणी सीमा रस्त्यांची कामं
12. भारतीय रेल्वे अंतर्गत येणारी कामं
13. श्यामा प्रसाद मुखर्जी शहरी मिशन
14. भारत नेट अंतर्गत फायबर ऑप्टिकल केबलिंगची कामं
15. पंतप्रधान कुसुम योजनेची कामं

16. वॉटर लाइफ मिशन अंतर्गत करण्यात येणारी कामं
17. पंतप्रधान ऊर्जा गंगा प्रकल्प
18. कृषी विज्ञान केंद्रांतर्गत रोजीरोटी प्रोजेक्ट
19. जिल्हा खनिज निधी अंतर्गत कामे
20. घन आणि द्रव्य कचरा व्यवस्थापनाची कामं

21. शेत तलाव योजनेची कामं
22. पशु शेड बनविणे
23. मेंढी/बकरीसाठी शेड बांधणे
24. पोल्टी शेड कन्स्ट्रक्शन
25. गांडुळ कंपोस्टिंग युनिट तयार करणे

ट्रेंडिंग बातम्या-

आता ‘या’ देशात अनोळखी माणसासोबत शरीरसंबंध ठेवता येणार नाहीत, कारण…

…म्हणून राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होतीये, आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वाचा खुलासा

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, पत्रात केले ‘हे’ आरोप

सुशांतसिंगच्या मृत्यूनंतर आता अभय देओलचा धक्कादायक खुलासा

…म्हणून नाशिक प्रशासनाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दिला घरीच थांबण्याचा सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More