तब्बल दोन वर्षांनी पंतप्रधान मोदी त्यांच्या आईच्या भेटीला, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
गांधीनगर | पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला (BJP) घवघवीत यश मिळालं. पाच पैकी चार राज्यात भाजपचा बोलबाला असल्याचा या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून (Assembly Election Results 2022) स्पष्ट झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वाखाली भाजपने चार राज्यात विजय मिळवला.
चार राज्यात भाजपचा दणदणीत विजय झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी गुजरातमध्ये भव्य रोड शो काढला. अहमदाबादमधील या रोड शोमध्ये प्रचंड जनसमुदाय दिसला. सर्व राजकीय कार्यक्रम आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आईच्या भेटीसाठी पोहोचले.
पंतप्रधान मोदी व त्यांची आई हिराबेन यांची तब्बल दोन वर्षानंतर भेट झाली. यापूर्वी ऑक्टोबर 2019मध्ये नरेंद्र मोदी व त्यांच्या आईची भेट झाली होती. या भेटीचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. एका फोटोत मोदी त्यांच्या आईसोबत बसून जेवण करत आहेत तर दुसऱ्या फोटोत मोदी त्यांच्या आईचा आशिर्वाद घेताना दिसत आहेत.
दरम्यान, पंतप्रधान मोदी व त्यांच्या आईच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. गेल्या वेळेस देखील नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईच्या भेटीचे फोटो फोटो व्हायरल झाले होते.
Gujarat: Prime Minister Narendra Modi meets his mother Heeraben Modi at her residence, in Gandhinagar pic.twitter.com/4CvlnsPQtm
— ANI (@ANI) March 11, 2022
थोडक्यात बातम्या-
पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी, मिळणार गलेलठ्ठ पगार
जो बायडन यांच्या तिसऱ्या महायुद्धाबद्दलच्या वक्तव्याने जगाचं टेन्शन वाढलं, म्हणाले…
“मला असा संशय येतोय की पवारसाहेबच दाऊदचा माणूस आहे”
Budget 2022: तृतीयपंथीयांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
Budget 2022: छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी तब्बल ‘इतक्या’ कोटींचा निधी जाहीर
Comments are closed.