Top News

देशाची वायुसेना दुबळी रहावी हीच काँग्रेसची इच्छा, मोदींचा काँग्रेसवर गंभीर आरोप

नवी दिल्ली |  देशाची वायुसेना दुबळी रहावी हीच काँग्रेसची इच्छा आहे, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपलं अखेरचं भाषण लोकसभेत करत आहेत.

संरक्षण व्यवहारात दलालीशिवाय काम कधीही झालं नाही याचा इतिहास साक्षीदार आहे, पण ते राफेलमध्ये न झाल्यामुळे टीका झाली, असाही पलटवार त्यांनी काँग्रेसवर केला आहे.

राफेल व्यवहार व्हावा हे काँग्रेसला वाटत नाही, 30 वर्ष सैन्याला निःशस्त्र करुन ठेवलं, असंही मोदी म्हणाले आहेत.

दरम्यान, निवडणुकीपूर्वीच्या आजच्या लोकसभेतील आपल्या अखेरच्या भाषणात त्यांनी केलेल्या कामांचा पाढा वाचला आहे तर काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

निवडणुकीपूर्वीचं लोकसभेतील नरेंद्र मोदींचं शेवटचं भाषण, वाचा त्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

राज्य सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण घटनाबाह्य; श्रीहरी अणेंचा न्यायालयात युक्तिवाद

“…जर असं झालं तर नितीश कुमारांना पंतप्रधान करू”

सुप्रिया सुळे Vs विजय शिवतारे असा सामना रंगणार?; भाजपची शिवसेनेला सूचना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या