सोलापूर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येसंदर्भात फेसबुकवर टाकण्यात आलेली पोस्ट माढ्यातील टेंभुर्णीत राहणाऱ्या एका तरुणाच्या अकाऊंटवरुन पडल्याचं स्पष्ट झालंय. या तरुणाचं अकाऊंट हॅक झालं होतं, अशी माहिती आहे.
बापू राजगुरु असं या तरुणाचं नाव आहे. गाझियाबाद पोलीस याप्रकरणाचा तपास करत त्याच्यापर्यंत पोहोचले होते. त्याने आपल्याला यासंदर्भात काही माहीत नसल्याचं तसेच हिंदी येत नसल्याचं सांगितलं. पोलिसांच्या तपासात त्याचं अकाऊंट हॅक झाल्याचं कळतंय.
दरम्यान, भाजप नेते शंकरराव वाघमारे यांनी यासंदर्भात एक पोस्ट फेसबुकवर पोस्ट केली होती. ज्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
महत्त्वाच्या बातम्या–
-अंकुर करपले; पावसा आता तरी तुला दया येईल का रे???
-पत्नीसोबत अनैसर्गिक संभोग; पतीविरोधात गुन्हा दाखल
-धक्कादायक!!! पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढणार???
-टेन्शनमध्ये होता के. एल. राहुल; विराट-अनुष्कानं अशी केली मदत!
-हस्तमैथुनच्या दृश्याला स्वतःच्या गाण्याचं पार्श्वसंगीत पाहून लता मंगेशकर संतापल्या!