मुंबई | गावात आपल्या घरातील किंवा भावकीतील सरपंच असला तरी घरातील व्यक्तिंचं वेगळंच वजन आपल्याला पाहायला मिळतं. मात्र एकीकडे चुलता देशाचा पंतप्रधान असताना पुतणीली तिकीट नाकारलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुतणी सोनल मोदीला गुजरात भाजपने तिकीट देण्यास नकार दिला आहे.
सोनल मोदी यांनी अहमदाबादच्या बोदकदेव वॉर्डातून भाजपकडे तिकीट मागितलं. त्यानंतर भाजपकडून उमेदवारांच्या नावाची घोषण करण्यात आली या यादीत सोनल मोदींचं नाव नव्हतं. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांनी विचारलं असता त्यांनी सर्वांना नियम सारखेच असल्याचं सांगितलं.
उमेदवारीसाठीचे निकष जाहीर केले आहेत. या निकषांमध्ये 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले, नेत्यांचे नातेवाईक आणि महापालिकेत तीन वेळा कार्यकाळ पूर्ण केलेल्यांना तिकीट मिळणार नसल्याचं सी.आर. पाटील यांनी सांगितंल आहे. यावर सोनल यांनी आपली प्रतिक्रया दिली आहे.
दरम्यान, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुतणी म्हणून नाही तर भाजपची एक कार्यकर्ती म्हणून तिकीट मागितलं असल्याचं सोनल मोदी म्हणाल्या.
थोडक्यात बातम्या-
विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच, या नेत्याची होऊ शकते निवड!
“बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेणं आणि स्मारक न बांधणं याला टाईमपास बोलतात”
“जर शेतकरी हिंसक झाला तर सर्व जबाबदारी भाजप सरकारची”
महाविकास आघाडीत वादाचा नवा मुद्दा; ते पद आता कुणाकडे जाणार?
“आम्ही तिन्ही पक्ष गुण्यागोविंदाने करभार करतोय, विरोधकांनी लावालावी करू नये”