त्यांना टीकेचा तर मला देशसेवेचा ध्यास, मोदींचा काँग्रेस नेत्यांना टोला

त्यांना टीकेचा तर मला देशसेवेचा ध्यास, मोदींचा काँग्रेस नेत्यांना टोला

नवी दिल्ली | जागतिक बँकेत काम केलेल्यांनी पंतप्रधानपद भूषवलं. हेच लोक जागतिक बँकेनं भारताच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊनही प्रश्न उपस्थित करतात, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस नेत्यांना लगावला.

भारतानं प्रगती केली त्याच्याशी त्यांना काहीच देणं-घेणं नाही. त्यांना स्वतःलाही काही करायचं नाही आणि जे करत आहेत त्यांना प्रश्न विचारायचे काम ते करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

जागतिक बँकेच्या अहवालावरून प्रश्न विचारण्यापेक्षा सगळ्यांनी देशाच्या विकासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असंही त्यांनी सांगितलं.

Google+ Linkedin