Top News देश

“सोडून दिलेली आग, कर्ज आणि आजार संधी मिळताच दुसऱ्यांदा वाढू शकतात”

नवी दिल्ली | ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा नागरिकांशी संवाद साधला. यावेळी, त्यांनी ‘दो गज दुरी, बहुत है जरुरी’ म्हणत पुन्हा एकदा त्यांनी नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय.

मी नागरिकांना आवाहन करतो की अतिआत्मविश्वासात फसू नका. करोना आपल्यापर्यंत पोहचणार नाही, अशा भ्रमात राहण्याची चूक करू नका. आपल्याकडे म्हटलं जातं, सावधानता हटी, दुर्घटना घटी… टाळाटाळ करत सोडून दिलेली आग, कर्ज आणि आजार संधी मिळताच दुसऱ्यांदा वाढू शकतात, असं आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलंय. त्यामुळे यावर उपचार गरजेचा आहे, असंही पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी काय म्हटलं?- 

-भारताची कोरोनाच्या विरोधातील लढाई ही खऱ्या अर्थाने लोकांनीच नेतृत्व केलेली आहे. भारतात कोरोनाच्या विरोधातील लढाई जनता लढत आहे, आपण लढत आहात, जनतेबरोबरीने एकत्रितपणे शासन, लढत आहे. विकासासाठी प्रयत्नशील भारतासारखा विशाल देश, गरिबीशी निर्णायक लढा देत आहे

-आपण कुठेही पाहिलंत तर, आपल्याला याची जाणीव होईल की, भारताची लढाई लोकांनी चालवलेली आहे. पूर्ण विश्व या महामारीच्या संकटाशी मुकाबला करत आहे. भविष्यात जेव्हा याची चर्चा होईल, तेव्हा भारताच्या या लोकांनी चालवलेल्या लढाईची चर्चा होणारच, असा मला विश्वास आहे

-मित्रांनो, दुसऱ्याला मदत करण्यासाठी, आपल्या मनात, ह्रदयाच्या एखाद्या कोपऱ्यात, ही जी उचंबळून येणारी भावना आहे ना तीच भावना कोरोनाच्या विरूद्ध भारताच्या या लढ्याला ताकद देत आहे. तीच भावना, या लढाईला खऱ्या अर्थानं लोकांनी चालवलेली लढाई बनवत आहे

-माझ्या प्रिय देशवासियांनो, मी आज अत्यंत आदरानं, 130 कोटी देशवासियांच्या या भावनेला, नतमस्तक होऊन वंदन करतो. आपल्या देशासाठी आपल्या वेळेप्रमाणे, आपल्याला,काही तरी करणं शक्य होईल, यासाठी सरकारनं एक डिजिटल मंच तयार केला आहे

-अगदी कमी कालावधीत, या पोर्टलशी सव्वाकोटी लोक जोडले गेले आहेत. यात डॉक्टर्स, परिचारिकांपासून ते आमच्या आशा कार्यकर्त्या, आमचे एनएसएसचे साथी, वेगवेगळ्या क्षेत्रांतले सर्व व्यावसायिक, त्यांनी, या मंचाला, आपला मंच बनवून टाकला आहे

-या परिस्थितीत आपण सर्व देशवासियांनी जी संकल्प शक्ति दाखवली आहे, त्यानं, भारतात एका परिवर्तनाची सुरूवात झाली आहे. आमचे व्यवसाय, आमची कार्यालये, आमचे वैद्यकीय क्षेत्र, प्रत्येकजण, वेगानं, नव्या तांत्रिक बदलांकडे पुढे निघाला आहे

आपल्यातील बहुतेकांना हे ठाऊक असेल की देशातल्या प्रत्येक भागात औषधे पोहचवण्यासाठी आपण #LifeLineUdan मोहिमेद्वारे देशातल्या देशातच, 3 लाख किलोमीटर अंतराचं हवाई उड्डाण केलं आहे आणि ५०० टनाच्यापेक्षाही जास्त वैद्यकीय साहित्य, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपल्यापर्यंत पोहचवलं आहे.

-भारतीय रेल्वेनं जवळजवळ ६० पेक्षा जास्त रेल्वेमार्गांवर १०० हून जास्त पार्सल ट्रेन्स सुरू केल्या आहेत. औषधांचा पुरवठा करण्यात, आमच्या टपाल खात्याचे लोक, अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. आमचे हे सर्व साथीदार, खर्या अर्थानं, कोरोनाचे योद्धेच तर आहेत

#PMGaribKalyanYojana अंतर्गत गरिबांच्या खात्यांमध्ये, पैसे थेट जमा केले जात आहेत. वृद्धावस्था पेन्शन जारी केली गेली आहे. गरिबांना तीन महिने विनामूल्य गॅस सिलिंडर, रेशनसारख्या सुविधा प्रदान केल्या जात आहेत

-मी, राज्य सरकारांचीही प्रशंसा करतो की ते या महामारीचा सामना करण्यात अत्यंत सक्रिय भूमिका बजावत आहेत. स्थानिक प्रशासन, राज्य सरकारं ज्या जबाबदारीचं पालन करत आहेत, त्यांची, कोरोनाच्याविरोधातल्या लढ्यात खूप मोठी भूमिका आहे. त्यांचे हे परिश्रम अत्यंत प्रशंसनीय आहेत.

-अलिकडेच जो अध्यादेश आणला आहे, त्याबद्दल समाधान व्यक्त केलं गेलं आहे. यात, कोरोना योद्ध्यांबरोबर जे हिंसा, छळ करण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्याविरोधात अत्यंत कडक शिक्षेची तरतूद आहे. आमचे डॉक्टर, परिचारिका, यासर्वांचं संरक्षण करण्यासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक होतं

-आज, देशाच्या कानाकोपऱ्यातनं लोक स्वच्छता कामगारांवर पुष्पवर्षाव करत असल्याची छायाचित्रं येत आहेत. डॉक्टर असो, पोलिस असो, व्यवस्थेबद्दलही सामान्य लोकांच्या मानसिकतेत मोठं परिवर्तन घडलं आहे. पोलिसिंगची मानवीय आणि संवेदनशील बाजू आमच्यासमोर आली आहे

-जेव्हा एखादं संस्कारित मन व्यवहार करत असतं तेव्हा त्यात आम्हाला संस्कृती दिसते. जेव्हा कुणी आपल्या मेहनतीनं कमावलेली, आपल्यासाठी आवश्यक असलेली वस्तु, पर्वा न करता, दुसऱ्या एखाद्या व्यक्तिची गरज पाहून, तिला देऊन त्याची गरज भागवतो, तीच तर संस्कृती आहे

-मित्रांनो, भारतानं प्रकृती आणि विकृतीपेक्षा वेगळा असा आपल्या संस्कृतीच्या अनुरूप निर्णय घेतला. आम्ही भारताच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न तर वाढवले आहेतच, परंतु आम्ही जगातल्या सर्व गरजूंपर्यंत औषधं पोहचवण्याचा विडा उचलला आणि मानवतेचं हे काम करून दाखवलं.

-जगानं योगाचा आनंदानं स्विकार केला आहे, तसंच, आमच्या हजारो वर्षे जुन्या आयुर्वेदाच्या सिद्धांतांचाही जग अवश्य स्विकार करणार. हां, यासाठी युवा पिढीला संकल्प करावा लागेल आणि जग जी भाषा समजतं त्याच वैज्ञानिक भाषेत आम्हाला समजावून सांगावं लागेल

-कोरोनाच्या कारणानं, जे बदल, आम्हाला आमच्या आसपास पहायला मिळत आहेत, त्यात सर्वात पहिला आहे तो मास्क चढवून आपला चेहरा झाकलेला ठेवणं. तसंतर आम्हाला सारे लोक मास्क चढवून पहायची कधीही सवय नव्हती

-मास्कबद्दलचीही धारणा बदलणार आहे. आपण पहाल, मास्क, आता सभ्य समाजाचं प्रतिक होईल. जर, आजारापासून स्वतःला वाचवायचं असेल, आणि दुसऱ्यांनाही वाचवायचं असेल, तर आपल्याला मास्क लावावाच लागेल, माझी तर साधी सूचना अशी आहे की, उपरणं वापरा, पूर्ण चेहरा झाकला पाहिजे

-आमच्या समाजात आणखी एक मोठी जागरूकता आली आहे की आता लोक सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यानं काय काय प्रकारचं नुकसान होऊ शकतं, हे समजू लागले आहेत. आता ती वेळ आली आहे की, या वाईट सवयीला कायमचं संपवलं पाहिजे. तर, उशिर झाला असला तरीही, आता ही थुंकण्याची सवय सोडून दिली पाहिजे.

-आज अक्षय्य तृतियेचं पवित्र पर्व आहे, ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि भगवान सूर्यदेव यांच्या आशिर्वादानं पांडवांना अक्षयपात्र मिळालं होतं, ज्यातलं अन्न समाप्त होत नसे. अन्नदाता शेतकऱ्यांच्या परिश्रमानं, आज आम्हा सर्वांसाठी, देशाकडे अक्षय अन्नभांडार आहे.

-या अक्षय तृतियेला आम्हाला आपलं पर्यावरण, वनं, नद्या आदी सर्वांच्या संरक्षणाबद्दल विचार केला पाहिजे, जे, आमच्या जीवनात महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. आम्हाला अक्षय रहायचं असेल तर आम्हाला प्रथम आमची धरणी अक्षय राहिल, हे सुनिश्चित करावं लागेल.

-जैन परंपरेतही हा एक खूप पवित्र दिवस आहे कारण पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांच्या जीवनात हा एक महत्वपूर्ण दिवस राहिला आहे. जैन समाजात याला एक पर्व म्हणून साजरं केलं जातं आणि कोणतंही शुभ कार्य याच दिवशी सुरू करण्यास लोक पसंती का देतात, हे समजणं सोपं आहे

-आज भगवान बसवेश्वरजी यांचीही जयंती आहे. मला भगवान बसवेश्वर यांच्या आठवणी आणि त्यांच्या संदेशाशी जोडलं जाण्याची, शिकण्याची संधी मिळाली, हे माझं सौभाग्य राहिलं आहे. देश आणि जगभरातल्या सर्व भगवान बसवेश्वर यांच्या अनुयायांना त्यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभकामना.

-या रमजानला संयम, सद्भावना, संवेदनशीलता आणि सेवाभावाचं प्रतिक बनवावं, ही आमच्यासमोर संधी आहे. यावेळेला आम्ही, पूर्वीपेक्षा जास्त प्रार्थना करू की ईद येईपर्यत संपूर्ण जग कोरोनापासून मुक्त होईल आणि आम्ही आशा आणि उत्साहानं ईद साजरी करू शकू

-माझ्या प्रिय देशवासियांनो, या जागतिक महामारीच्या संकटातच आपल्या परिवारातला एक सदस्य या नात्यानं, काही सूचना करणं, ही माझी जबाबदारी बनते. अतिआत्मविश्वासात, आमच्या शहरात, आमच्या गावात, आमच्या गल्लीत, आतापर्यंत कोरोना पोहचलेला नाही, म्हणून आता पोहचणार नाही, असा विचार मनात आणू नका

किरकोळ म्हणून सोडून दिलेली आग, कर्ज आणि आजार, संधी मिळताच पुन्हा वाढून धोकादायक बनतात. म्हणून त्यावर पूर्ण पद्धतीचे उपचार अत्यंत आवश्यक असतात. दोन फुट अंतर ठेवा, स्वतःला निरोगी ठेवा, आपल्या सर्वांच्या उत्तम आरोग्याची कामना करत, मी माझी ही मन की बात संपवत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जॉंग उनचा खरंच मृत्यू झाला आहे का?

…तर ‘या’ महिलेकडे येऊ शकते उत्तर कोरियाची जबाबदारी; कोण आहे ही महिला?

अहमदनगरच्या लेकीचा पराक्रम; आता अवघ्या 15 मिनिटात कळणार कोरोना आहे की नाही…

महत्वाच्या बातम्या-

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी जनतेला केलं ‘हे’ भावनिक आवाहन

पंतप्रधान करणार ‘मन की बात’; काय बोलणार याकडे देशाचं लक्ष

अबब!!! कोरोनासंदर्भात राज्यात तब्बल एवढ्या जणांवर गुन्हे दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या