लोकसभा निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

PM Narendra Modi | अवघ्या देशाचं लक्ष लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागलं असताना अखेर निकाल जनतेच्या समोर आला. महाराष्ट्रामध्ये भाजपला सर्वात मोठा झटका बसल्याचं चित्र पहायला मिळत आहे. भाजपने 400 पारचा नारा दिला मात्र भाजपने पाहिलेलं हे स्वप्न, स्वप्नचं राहिलंय. या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले मोदी?

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर मोदींनी (PM Narendra Modi) पहिली प्रतिक्रिया दिली. मोदी म्हणाले की, मला दिलेल्या प्रेम आणि आशीर्वादासाठी मी माझ्या कुटुंबीयांना प्रणाम करतो. पुढे ते म्हणाले की, मी माझ्या देशवासियांना खात्री देतो की, आम्ही जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नवीन उर्जा, उत्साह आणि एक नवीन संकल्प घेऊन पुढे जाऊ.

कृतज्ञता व्यक्त करतो-

बोलत असताना मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या समर्पण आणि अथक परिश्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास व्यक्त केला आहे.

एनडीए जवळपास 290 जागांवर आघाडीवर असून त्यापैकी 240 जागा भाजपच्या वाट्याला जात आहेत. याचा अर्थ पंतप्रधान मोदींच्या तोंडावर निवडणूक लढवणाऱ्या भाजपला यावेळी स्वबळावर बहुमत मिळवता आलं नाही.

News Title: PM Narendra Modi On Loksabha Election Result

महत्त्वाच्या बातम्या-

बीडमध्ये धाकधुक वाढली! पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपणार?

शरद पवारांच्या हातून बालेकिल्ला निसटला, पवारांच्या शिलेदाराचा पराभव

नगरमध्ये लंके पॅटर्न! इंग्रजी बोलायला लावणाऱ्या सुजय विखेंची बोलती बंद

उद्धव ठाकरेंचा एक शिलेदार अवघ्या 48 मतांनी पराभूत

बीडमध्ये नेमकं काय सुरु आहे?, पंकजा मुंडेंचा खरंच पराभव झाला आहे का?