“अगोदर दहशतवादी हल्ले करून निघून जायचे, आता थेट सर्जिकल स्ट्राईक होतो”

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 15 ऑगस्टरोजी भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. लोकसभा निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त पहिलंच भाषण झालं. यावेळी मोदींनी भारतीयांना संबोधित करत भाषण केलं. मोदी यांनी कॉँग्रेसवर जोरदार निशाणा साधत मोदी सरकारने केलेल्या कामांचा आढावा दिला. (PM Narendra Modi )

कोरोनाच्या संकटकाळात जगात सर्वात वेगाने कोट्यवधी लोकांना लसीकरणाचं काम आपल्या याच देशात झालं. याच देशात कधीकाळी दहशतवादी आपल्याला येऊन मारून निघून जात होते. पण जेव्हा देशाचं लष्कर सर्जिकल स्ट्राईक करतं, एअरस्ट्राईक करतं तेव्हा देशवासीयांचा उर अभिमानानं भरून जातो. याचमुळे 140 कोटी देशवासीयांचं मन आत्मविश्वासाने भरून आलं आहे. असं मोदी म्हणाले.

“2047 मध्ये विकस्तीत भारत बनवण्याचा संकल्प”

“जेव्हा राजकीय नेतृत्वाचा संकल्प असेल, जेव्हा सरकारी यंत्रणा त्या लागू करण्यासाठी समर्पण भावाने कामाला लागते, देशाचे नागरिक ते जनआंदोलन म्हणून स्वीकारतो तेव्हा निश्चित परिणाम दिसतोच दिसतो.”, असं म्हणत मोदी यांनी कॉँग्रेसला टोला लगावला.

एक काळ होता जेव्हा लोक देशासाठी बलिदान देण्यासाठी बांधील होते आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आज देशासाठी जगण्यासाठी बांधील होण्याचा हा काळ आहे. आपला हा संकल्प समृद्ध भारत बनवू शकेल. विकसित भारत 2047 हे फक्त भाषणाचे शब्द नाहीत. यामागे कठोर कष्ट चालू आहेत. कोट्यवधी नागरिकांच्या सूचना घेतल्या जात आहेत. आम्ही देशवासीयांकडून सूचना मागवल्या. मला आनंद आहे की, देशाच्या कोट्यवधी नागरिकांनी विकसित भारत 2047 साठी अगणित सूचना केल्या आहेत.(PM Narendra Modi )

घराणेशाही, जातीवादमुळे भारताच्या लोकशाहीचं मोठं नुकसान

या सूचनांमध्ये जगातला स्किल कॅपिटल भारताला बनवण्याची सूचना केली. काहींनी भारताला उत्पादनाचं ग्लोबल हब बनवण्याची सूचना केली. काहींनी भारतीय विद्यापीठं ग्लोबल व्हावीत अशी सूचना केली. काहींनी माध्यमं ग्लोबल व्हावीत अशी सूचना केली. काहींनी आपला युवक जगाचं पहिलं प्राधान्य राहायला हवा अशी सूचना केली. शेतकरी अन्न उत्पादित करतात, त्या सुपर फूडला जगातल्या प्रत्येक डायनिंग टेबलवर पोहोचवायचं असल्याचं मोदी यांनी म्हटलं. (PM Narendra Modi)

यावेळी मोदींनी घराणेशाहीवरही भाष्य केलं. “देशात घराणेशाही, जातीवाद भारताच्या लोकशाहीचं मोठं नुकसान करत आहे. देशाला, राजकारणाला आपल्याला घराणेशाही व जातीवादापासून मुक्ती द्यावी लागेल. आपलं एक ध्येय हेही आहे की, आपण लवकरात लवकर राजकीय दृष्ट्या 1 लाख अशा तरुणांना पुढे आणू इच्छितो, ज्यांच्या कुटुंबात कुणाचीही राजकीय पार्श्वभूमी असणार नाही.”, असं मोदी म्हणाले.

News Title-  PM Narendra Modi on Surgical strike

महत्वाच्या बातम्या-

लाल किल्ल्यावरून PM मोदींची देशभरातील युवकांसाठी मोठी घोषणा; म्हणाले..

“स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्यांचं रक्त आपल्या नसांमध्ये..”; PM मोदींचं देशवासीयांना मोठं आवाहन

लाडक्या बहीणींनो, योजनेचा पहिला हप्ता आला; खात्यात 3000 आले की नाही असं चेक करा

आज स्वातंत्र्यदिनाचा दिवस ‘या’ राशींसाठी भाग्याचा; मोठा धनलाभ होणार

राज्यात पावसाची विश्रांती; आता थेट ‘या’ तारखेनंतर वाढणार पावसाचा जोर