बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रोंगाली बिहू कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा जलवा, पारंपारिक वाद्य वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी रोंगाली बिहू सणानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत विविध संगीत साहित्य वाजवण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात आसामच्या आदिवासी लोकांकडून वाजवण्यात येणारं वाद्य वाजवलं. ढोलकी सारखं दिसणारं हे वाद्य वाजवल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पिपाणी प्रकारातील वाद्य वाजवण्याचाही आनंद घेतला. या कार्यक्रमात पारंपारिक नृत्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं.

रोंगाली बिहू सणानिमित्तच्या कार्यक्रमात आसाममधील आदिवासी नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्व कार्यक्रमांचा पुरेपुर आनंद घेतला.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी वेळोवेळी अनेक स्थानिक उत्सवात सहभागी होत संस्कृतीशी एकरूप होणाऱ्या प्रयत्न केला. यावेळी देखील पंतप्रधान मोदींनी रोंगाली बिहू सणानिमित्त सर्व कार्यक्रमात आवर्जून सहभाग घेतला. पारंपारिक वाद्य वाजवतानाचा पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी रशियाची शेवटची खेळी?, धक्कादायक माहिती समोर

किरीट सोमय्यांविरोधात शिवसेना आक्रमक, उचललं ‘हे’ मोठं पाऊल

“…तर जशास तसं उत्तर देण्याची धमक आमच्यातही आहे”

‘आय रिपीट…’, संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा

“उद्धव ठाकरे बिनकामी पूर्ण पगारी मुख्यमंत्री”; राणांचे धारदार बाण चालूच

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More