नवी दिल्ली | सध्याच्या काळात करोना बाधित रुग्णांची काळजी घेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विशेष पॅकेज जाहीर केलं आहे. तरीही समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोकं आपलं कर्तव्य ओळखून सरकारी यंत्रणांना आर्थिक मदत करत आहेत. भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनानेही कोरोनाविरोधातील लढ्यात आपलं योगदान दिलं होतं. यावर नरेंद्र मोदींनी रैनाचे खास अंदाजात आभार मानले आहेत.
रैना उत्तम फलंदाज आहे. त्यामुळे मोदींनी त्याला आवडेल अशा प्रकारे रिप्लाय देत त्याचे आभार मानले. रैनाने केलेल्या 52 लाखांच्या मदतीवर हे एक उत्तमरित्या झळकावलेलं अर्धशतक आहे, असं मोदी यांनी म्हटलं आहे.
सुरेश रैनाला इतक्यातच पुत्रप्राप्ती झाली असून तो बाप झाला आहे. काही दिवसांपूर्वी रैनाच्या पत्नीने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता.
दरम्यान, मुंबई क्रिकेट संघटनेनेही मुख्यमंत्री सहायता निधीला 50 लाखांची मदत केली आहे. तर बीसीसीआयने 51कोटींचे सहाय्य केले आहे. तसेच, परिस्थिती बिघडल्यास आपल्या अखत्यारीत येणारी मैदानं वैद्यकीय सुविधेसाठी खुली करण्याची तयारी एमसाएने दाखवली आहे.
That’s a brilliant fifty, @ImRaina! #IndiaFightsCorona https://t.co/O6vY4L6Quo
— Narendra Modi (@narendramodi) March 28, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“राज्य सरकारने चुकीच्या निर्णयाची मालिकाच सुरु केली….तरीच महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत आहेत”
पुणेकरांना दिलासा; दोन महिला कोरोनामुक्त, लवकरच डिस्चार्ज
महत्वाच्या बातम्या-
मुंबईत झोपडपट्ट्या, चाळींमध्ये कोरोनाचे रुग्ण; खबरदारी म्हणून 147 ठिकाणं पालिकेकडून सील
कोरोना कसा पसरतो?; अमोल कोल्हेंनी समजावला कोरोनाचा गुणाकार
नवे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोलापूरकरांना दिलं ‘हे’ आश्वासन
टेलिग्रामवर सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच पुढील लिंकवर क्लिक करा- https://t.me/thodkyaatNews
Comments are closed.