बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भागवत कराडांच्या ‘कर्तव्यदक्षतेच्या प्रवासाचं’ पंतप्रधानांनीही केलं कौतुक

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या प्रसंगावधानामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. विमान प्रवासादरम्यान अचानकच एका प्रवाशाची तब्येत बिघडली आणि भागवत कराड क्षणाचाही विलंब न करता त्या प्रवाशाच्या मदतीला धावून गेले. डॉ कराडांच्या या कर्तव्यदक्षतेचं त्यांच्या केंद्रीय मंडळातील सहकाऱ्यांसह खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केलं आहे.

केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड हे इंडिगो फ्लाईटने प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान एका प्रवाशाला अचानक गंभीर आरोग्य समस्या उद्भवली आणि ते जमिनीवर कोसळले. प्रवाशांची कुजबुज भागवत कराड यांच्या कानावर पडल्यावर त्यांनी मिनिस्ट्री प्रोटोकॉलचा विचार न करता त्या प्रवाशावर तातडीने प्राथमिक उपचार केले. भागवत कराड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांचा हा कर्तव्यदक्षतेचा प्रवास सांगितला आहे.

आपल्या अनुभवामुळे अखाद्या गरजूला मदत होते तेव्हा मिळणारं समाधान खुप मोठं असतं आणि याची आणखी एकदा अनुभूती घेतल्याचं डॉ भागवत कराड यांनी लिहिलं आहे. तर ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’, ही संतांची शिकवण कायम लक्षात ठेवून मदतीसाठी पुढाकार घ्या, असे आवाहन भागवत कराड यांनी केलं आहे.

इंडिगो फ्लाईटने कराड यांचा रूग्णासोबतचा फोटो शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत. तर पंतप्रधान मोदींनीही इंडिगो फ्लाईटचं ट्विट रिट्विट करत त्यांच्या सहकार्याचे कौतुक केले आहे. ते मनाने नेहमीच डॉक्टर आहेत. माझे सहकारी डॉ भागवत कराड यांच्या कामाचं कौतुक आहे, या शब्दात पंतप्रधान मोदींनी भागवत कराड यांच्या प्रसंगावधानाचं कौतुक केलं आहे.

 

 

 

 

थोडक्यात बातम्या-

“देवेंद्रजी उघडा डोळे बघा नीट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत तुम्ही नाही”

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात पण मृतांचा आकडा वाढला

“आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी या सरकारची अवस्था”

‘पद्म पुरस्कार येत आहे’; विक्रम गोखलेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून बॉलिवूड अभिनेत्रीने साधला निशाणा

” उद्धव ठाकरे तर पार्टटाईम मुख्यमंत्री, फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा “

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More