बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना नरेंद्र मोदींनी सुनावलं, म्हणाले…

नवी दिल्ली | सोशल मीडियावर सध्या ‘द काश्मिर फाइल्स’(The kashmi files) चित्रपटावरून वरुन चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहेत. अनेकांनी या चित्रपटाबद्दल सकारात्मक मतं व्यक्त केली आहेत. तर काहींनी या चित्रपटाच्या माध्यमातून दोन समाजांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप केले आहेत.

दिल्लीमध्ये पार पडलेल्या भाजपाच्या संसदीय समितीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) चित्रपटावरुन मतवारे असतानाच आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

चित्रपटाला विरोध करणारे लोक इतर वेळेस अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे झेंडे घेऊन मिरवत असतात असा टोलाही नरेंद्र मोदींनी लगावला. सध्या तुम्ही पाहिलं असेल की ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची चर्चा सुरु आहे. निर्माता, दिग्दर्शकाला जे सत्य वाटलं ते त्यानी सादर करण्याचा प्रयत्न केला असंही पंतप्रधानांनी म्हंटल आहे.

दरम्यान, सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची. 12 मार्च रोजी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, त्यांची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी, चित्रटाचे निर्माते अभिषेक यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळीही मोदींनी चित्रपटाचं कौतुक केलं आणि चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या देखील दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

सकाळचा चहा ठरू शकतो घातक, वाचा ‘हे’ गंभीर परिणाम

IPL खेळाडूंसाठी आणलेल्या बसेस मनसेने फोडल्या, वाचा काय आहे प्रकरण?

तळीरामांसाठी आनंदाची बातमी! सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान नाटोने दिलेल्या गंभीर इशाऱ्याने जगाचं टेन्शन वाढलं

“माझ्यासारख्या कलाकारांना…”, अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने सांगितले मराठी इंडस्ट्रीतले धक्कादायक अनुभव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More