“स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्यांचं रक्त आपल्या नसांमध्ये..”; PM मोदींचं देशवासीयांना मोठं आवाहन

PM Narendra Modi | भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनी देशभरात जल्लोष केला जात आहे. देशात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज 15 ऑगस्टरोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. लोकसभा निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त पहिलंच भाषण होत आहे.यावेळी त्यांनी देशवासीयांना (PM Narendra Modi) मोठं आवाहन केलं.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक संकटांमुळे आपल्या सगळ्यांच्या चिंता वाढत आहेत. नैसर्गिक संकटात अनेक लोकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. संपत्ती गमावली आहे. देशानंही संपत्तीचं नुकसान भोगलंय. मी त्या सगळ्यांप्रती आज संवेदना व्यक्त करतो आणि हा विश्वास देतो की हा देश या संकटाच्या काळात त्यांच्यासोबत उभा आहे.

स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आठवा. शेकडो वर्षांची गुलामगिरी. प्रत्येक काळ संघर्षाचा राहिला. तरुण, महिला, आदिवासी, शेतकरी या सगळ्यांनीच अविरत लढा दिला. इतिहास साक्षी आहे की, 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या आधीही देशाच्या अनेक आदिवासी भागांमधून स्वातंत्र्याचा लढा दिला जात होता. गुलामगिरीचा एवढा मोठा काळ, जुलुमी शासक, अखंड यातना, सामान्यांचा विश्वास तोडण्याचा प्रत्येक मार्ग हे सगळं असूनही तेव्हाच्या लोकसंख्येनुसार स्वातंत्र्यापूर्वी 40 कोटी देशवासीयांनी संघर्षाचा संकल्प केला.(PM Narendra Modi)

“140 कोटी देशवासीयांनी ठरवलं तर..”

भारताच्या स्वातंत्र्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. आपल्याला गर्व आहे की, आपल्या नसांमध्ये त्यांचच रक्त आहे. ते आपले पूर्वज होते. 40 कोटी लोकांनी जगाच्या महासत्तेला उचलून फेकून दिलं होतं. आपल्या नसांमध्ये रक्त असणाऱ्या आपल्या पूर्वजांनी 40 कोटी असूनही गुलामगिरीच्या साखळ्या तोडल्या, 40 कोटी लोक स्वातंत्र्याचं स्वप्न पूर्ण करू शकतात, तर 140 कोटी देशवासीय नागरिकांनी ठरवलं, संकल्प केला तर कितीही आव्हानं आली, कितीही कमतरता असल्या, कितीही साधनांसाठी लढा द्यावा लागला तरी सर्व संकटं पार करून आपण समृद्ध भारत 2047  च्या विकसित भारताचं ध्येय साध्य करू शकतो.(PM Narendra Modi)

एक काळ होता जेव्हा लोक देशासाठी बलिदान देण्यासाठी बांधील होते आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आज देशासाठी जगण्यासाठी बांधील होण्याचा हा काळ आहे. आपला हा संकल्प समृद्ध भारत बनवू शकेल. विकसित भारत 2047 हे फक्त भाषणाचे शब्द नाहीत. यामागे कठोर कष्ट चालू आहेत. कोट्यवधी नागरिकांच्या सूचना घेतल्या जात आहेत. आम्ही देशवासीयांकडून सूचना मागवल्या. मला आनंद आहे की, देशाच्या कोट्यवधी नागरिकांनी विकसित भारत 2047 साठी अगणित सूचना केल्या आहेत.

“देशात कधीकाळी दहशतवादी येऊन..”

या सूचनांमध्ये जगातला स्किल कॅपिटल भारताला बनवण्याची सूचना केली. काहींनी भारताला उत्पादनाचं ग्लोबल हब बनवण्याची सूचना केली. काहींनी भारतीय विद्यापीठं ग्लोबल व्हावीत अशी सूचना केली. काहींनी माध्यमं ग्लोबल व्हावीत अशी सूचना केली. काहींनी आपला युवक जगाचं पहिलं प्राधान्य राहायला हवा अशी सूचना केली. शेतकरी अन्न उत्पादित करतात, त्या सुपर फूडला जगातल्या प्रत्येक डायनिंग टेबलवर पोहोचवायचं आहे. (PM Narendra Modi)

जेव्हा लाल किल्ल्यावरून सांगितलं जातं की, भारताच्या 18 हजार गावांमध्ये वीज पोहोचवली जाते, तेव्हा सामान्य माणसाचा विश्वास वाढतो. जेव्हा स्वच्छ भारतावर बोललं जातं तेव्हा या देशातले सर्वोच्च स्थानावर बसलेल्या लोकांपासून गावागावांतल्या लोकांपर्यंत स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित होतं.  कोरोनाच्या संकटकाळात जगात सर्वात वेगाने कोट्यवधी लोकांना लसीकरणाचं काम आपल्या याच देशात झालं. याच देशात कधीकाळी दहशतवादी आपल्याला येऊन मारून निघून जात होते. पण जेव्हा देशाचं लष्कर सर्जिकल स्ट्राईक करतं, एअरस्ट्राईक करतं तेव्हा देशवासीयांचा उर अभिमानानं भरून जातो. याचमुळे 140 कोटी देशवासीयांचं मन आत्मविश्वासाने भरून आलं आहे. जेव्हा राजकीय नेतृत्वाचा संकल्प असेल, जेव्हा सरकारी यंत्रणा त्या लागू करण्यासाठी समर्पण भावाने कामाला लागते, देशाचे नागरिक ते जनआंदोलन म्हणून स्वीकारतो तेव्हा निश्चित परिणाम दिसतोच दिसतो.(PM Narendra Modi)

News Title-  pm narendra modi speech 78th independence day

महत्वाच्या बातम्या-

लाडक्या बहीणींनो, योजनेचा पहिला हप्ता आला; खात्यात 3000 आले की नाही असं चेक करा

आज स्वातंत्र्यदिनाचा दिवस ‘या’ राशींसाठी भाग्याचा; मोठा धनलाभ होणार

राज्यात पावसाची विश्रांती; आता थेट ‘या’ तारखेनंतर वाढणार पावसाचा जोर

पुरुषांच्या ‘त्या’ समस्या दूर करेल लसूण; जाणून घ्या इतर फायदे

आम्ही हिंदू आहोत..’मी पुन्हा जन्म घेतला तर देवा मला मुलगा बनव’