मुंबई | उत्तर प्रदेशमध्ये हाथरस जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. 20 वर्षीय दलित मुलीवर नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या घटनेचा देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यासंदर्भात फोन केला आहे.
नरेंद्र मोदींनी माझ्यासोबत हाथरस घटनेवरुन संवाद साधवा. आरोपींविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे असं यावेळी त्यांनी सांगितलं असल्याचं योगी यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात योगींनी ट्विट करत माहिती दिली आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ योगींच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे.
आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी ने हाथरस की घटना पर वार्ता की है और कहा है कि दोषियों के विरुद्ध कठोरतम कार्रवाई की जाए।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) September 30, 2020
महत्वाच्या बातम्या-
“हाथरस येथील बलात्कार प्रकरणावर स्मृती इराणी गप्प का?”
“नटीला सुरक्षा देणारे, तिच्या स्वागताला गेलेले रामदास आठवले आता कुठे गेले?”
संजय राऊत यांना कुणाल कामराचं निमंत्रण; म्हणाला…
“उत्तर प्रदेशमध्ये बलात्काराची महामारी पसरली, हाथरस हे केवळ एक उदाहरण”