देश

‘माझ्यावर प्रेम असेल तर एवढचं करा…’; पंतप्रधान नरेंद्र मोदींच आवाहन

नवी दिल्ली | जर माझ्यावर प्रेम असेल तर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असे पर्यंत एका कुटुंबाची जबाबदारी घ्या, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे.

एका जागी पाच मिनिटं उभं राहून मोदींना सन्मानित करा अशी मोहीम काही जणांनी सुरू केल्याचं कळतंय. यामागे कोणाचा चांगला हेतूही असू शकतो, असं मोदींनी सांगितलं आहे.

जर कोणी मोदींना सन्मानित करू इच्छित आहे आणि माझ्यावर इतकं प्रेम आहे तर करोना व्हायरसचा प्रादुर्भाव असेपर्यंत एका गरीब कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी, असं ट्विट मोदींनी केलं आहे.

माझ्यासाठी यापेक्षा मोठा कोणताही सन्मान नसेल, असं नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

“लोकहो, घरात व्यायाम करा, ज्यांना त्रास आहे त्यांनी खाण्यावर नियंत्रण ठेवा; आपल्याला युद्ध जिंकायचंय”

“केंद्राने जे दिलंय ते वाटतोय, पण केंद्राने सगळंच दिलंय असा गैरसमज नको”

महत्वाच्या बातम्या-

“14 एप्रिलनंतर लॉकडाउन पूर्णपणे उठवणार नाही”

आव्हाडांना बडतर्फ करा अन्यथा लॉकडाऊन तोडून ठाण्यात घुसू; भिडेंच्या धारकऱ्यांची धमकी

कोरोनाग्रस्तांवर उपचारांसाठी तीन प्रकारची वेगवेगळी रुग्णालयं; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या