Top News देश

शेतकऱ्यांनो कृषी क्षेत्राच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व भिंती आपण पाडत आहोत- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली |  गेल्या अनेक दिवसांपासून कृषी विधेयकाच्या विरोधात आंदोलन चालू आहे. शेतकऱ्यांनीसुद्धा चांगलंच लावून धरलं असून मागे हटणार नसल्याचं म्हटलं आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली हे.

कृषी कायद्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कृषी क्षेत्राच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व भिंती आपण पाडत आहोत, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  FICCI च्या 93 व्या वार्षिक बैठकीचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

कृषी क्षेत्र आणि त्याच्याशी निगडीत अन्य क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा असो, फूड प्रोसेसिंग, साठवण्याची प्रक्रिया, कोल्ड चेन यामध्ये आपण अनेक अडथळे येतात. या समस्या दूर केल्या जाणार मोदी म्हणाले.

दरम्यान, या कायद्यातील सुधरणांनंतर शेतकऱ्यांना नवे बाजार मिळतील आणि इतर पर्याय उपलब्ध होतील त्यासोबतच तंत्रज्ञानाची मदतही होणार असल्याचं मोदींनी सांगितलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक!; पुण्यातील भाजप आमदाराच्या घरात मोठी चोरी, इतक्या लाखाचे दागिने लंपास

पवार कधी शिवसेनेला तंगड वर करायला सांगतील आणि…; भाजपचा शिवसेनेला टोला

महासागराप्रमाणे खोली अन्…!म्हणत रोहित पवारांनी आजोबांना दिल्या खास शुभेच्छा

“…तर 2014 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभवाला पाहावा लगला नसता”

धक्कादायक! ‘द डर्टी पिक्चर’ मधील अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या