दलालांमुळे आपल्या शेतकर्याची घुसमट होऊ नये अशी माझी इच्छा- नरेंद्र मोदी
नवी दिल्ली | गेल्या अनेक महिन्यांपासून राजधानी दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन चालू आहे. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन चालू आहे. मात्र हे आंदोलन शेतकऱ्यांचं नसून दलालांचं असल्याची टीका भाजपचे नेते करतात. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दलालांवर निशाणा साधत नवे शेतकरी कायदे शेतकऱ्यांच्या कसे फायद्याचे आहेत हे सांगितलं आहे. कोईम्बतूरमध्ये नरेंद्र मोदींची प्रचारसभा झाली त्यावेळी ते बोलत होते.
आपल्या देशातील छोट्या शेतकऱ्याने कोणावरही अवलंबून राहावं अशी आमची इच्छा नाही. मात्र दलालांमुळे आपल्या शेतकर्याची घुसमट होऊ नये अशी इच्छा आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान किसान योजनेला कालच दोन वर्षे पूर्ण झाली. या योजनेचा कोटी शेतकर्यांना लाभ झाला असल्याचं मोदींनी सांगितलं. यावेळी बोलताना मोदींनी द्रमुक आणि काँग्रेसवर निशाणा साधला.
अम्मा जयललितांशी द्रमुक कशी वागली हे संपूर्ण तामिळनाडूला माहित आहे. यातून महिलांविषयी त्यांचा दृष्टीकोन दिसून येतो. दुर्दैवाने जयललिताजींचा छळ करणाऱ्यांचा द्रमुक आणि कॉंग्रेसच्या नेत्यांना बक्षीस दिलं गेलं. संपूर्ण तमिळनाडूचा पक्ष म्हणण्याचा अधिकार द्रमुकने गमावला असून राज्यातील जनतेने त्यांना नाकारलं आहे. 25 वर्षांपूर्वी त्यांनी पूर्ण बहुमत मिळवलं होतं असं नरेंद्र मोदी म्हणाले.
दरम्यान, देशात नागरिकांना दोन वेगवेगळ्या प्रकारचे राजकारण बघायला मिळत आहे. एक विरोधकांचे राजकारण जे भ्रष्टाचार आणि कुशासनाने ग्रस्त आहे. तर एनडीएचे सरकार जनतेबद्दल करुणा दाखवून राजकारण करत आहे, असं म्हणत मोदींनी विरोधकांना टोला लगावला.
थोडक्यात बातम्या-
तो आला, जामीन मिळवला आणि पोलिसांच्या हातावर तुरी देत पुन्हा फरार झाला!
नराधमाने तब्बल 66 जणींवर केला बलात्कार, अशा पद्धतीने महिलांना ओढायचा आपल्या जाळ्यात!
पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक
संजय राठोड यांच्याविरोधात तक्रार देण्याची हिम्मत दाखवणाऱ्या स्वरदा बापट कोण?, जाणून घ्या
“कोरोनाची लस भारतात कधी उपलब्ध होईल, मला कोणी सांगू शकेल का?”
Comments are closed.