बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान असणार- कंगणा राणावत

मुंबई | आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगणा राणावत नेहमीच चर्चेत असते. दिल्लीमध्ये चालू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवर कोणी टीका केली तर त्या टीकेला कंगणा ट्विटच्या माध्यामातून प्रत्युत्तर देत होती. यामध्ये काही सेलिब्रिटी आणि कंगणामध्ये ट्विटवार सुरू होतं. तशी कंगणा कायम सोशल माध्यमांवर चर्चेत असते.

कंगणा राणावत नेहमीच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं समर्थन करताना दिसते. अशातच कंगणाने पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं कौतुक करणारं ट्विट केलं आहे. सस्पेंड होण्याच्या किमतीवर मी जाहिरपणे सांगते की 2024 ला मोदीच पुन्हा पंतप्रधान बनतील, असं कंगणा राणावतने म्हटलं आहे. भारत जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असल्याचं सांगणाऱ्या अहवालावर कंगणाने ट्विट केलं आहे.

2024 मध्ये नरेंद्र मोदींनी निवडणुक जिंकत ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले तर 2019 च्या वेळी सुद्धा केंद्रात भाजपची सत्ता आली आणि मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान झाले. आता 2024 वेळी मोदी तिसऱ्यांदाही पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान होतील असा विश्वासही व्यक्त केला आहे.

दरम्यान, कंगणा लवकरच ‘थलाइवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. तसेच तिचा ‘धाकड’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबईची पहिली माफिया क्वीन गंगुबाईची जाणून घ्या खरी कहाणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘या’ ठिकाणी घेतली कोरोनाची लस

मोठी बातमी! कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ शहरात लॉकडाऊनची घोषणा

तारीख पे तारीख… एमपीएससीच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या

…अन्यथा तुझं करिअर खराब करेल, अशी धमकी देत त्यानं बलात्कार केला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More