बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान मोदींचा राष्ट्राध्यक्ष पुतीनला फोन, दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

नवी दिल्ली | रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर सैन्य कारवाईचे आदेश दिले. पुतीन यांच्या या घोषणेनंतर रशिया-युक्रेन युद्धाला तोंड फुटलंं. रशिया आणि युक्रेनच्या वादात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी, अशी विनंती युक्रेनच्या राजदूतांनी केली होती.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात अत्यंत महत्वपूर्ण चर्चा झाली. या दोन नेत्यांमध्ये जवळपास 20 ते 25 मिनीटांची चर्चा झाली. या चर्चेदरम्यान मोदींनी पुतीन यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

पुतीन यांनी मोदींना युक्रेनबाबत अलीकडील घडामोडींची माहिती दिली. तर रशिया आणि नाटो यांच्यातील मतभेद प्रामाणिक आणि पारदर्शक संवादानेच सोडवले जाऊ शकतात, असा सल्ला पंतप्रधान मोदींनी दिला आहे. रशिया व युक्रेनमधील सध्यस्थिती पाहता पंतप्रधान मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यातील चर्चा महत्वाची मानली जात आहे.

दरम्यान, पुतीन यांच्याशी बोलताना मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यावर भारताचा जोर असल्याचंही पंतप्रधान मोदींनी पुतीन यांच्याशी बोलताना स्पष्ट केलं.

 

थोडक्यात बातम्या-

“या सरकारने राजीनामा दिला पाहिजे, एका देशद्रोही व्यक्तीला मंत्री म्हणून…”

 “ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही याची काळजी घ्या”

“आघाडी सरकारमधील नेते स्वत:च सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावतील”

युक्रेनच्या ‘या’ अभिनेत्रीच्या पाठीवर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो, पाहा फोटो

Russia-Ukraine War | केंद्र सरकारकडून भारतीयांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More