मोठी बातमी! नरेंद्र मोदींनी दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा

PM Narendra Modi | लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात भाजपला चांगलाच धक्का बसल्यामुळे सगळीकडे एकच चर्चा रंगली. भाजपने 400 पारचा नारा दिला मात्र भाजपचं हे स्वप्न भंगल आहे. मात्र, आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

नरेंद्र मोदींचा राजीनामा-

नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) पंतप्रधानपदाचा राजीनामा दिलाय. राष्ट्रपतीं द्रोपर्दी मुर्मु यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलाय. तर 7 जूनला भाजपच्या संसदीय पक्षासह एनडीएची (NDA) बैठक होणारे. या बैठकीमध्ये मोदींनाच नेता म्हणून निवडण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. संसद भवनात या दोन्ही बैठका होणारेत. तर मोदी सरकारचा शपथविधी 8 जूनला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजप नेते नवीन सरकार स्थापन करण्यासाठी तयारीला लागतील असं म्हटलं जात आहे. राष्ट्रपती सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला बहुमत स्थापन करण्यासाठी बोलवतील त्यानंतर बुहमत चाचणी घेतली जाईल असं म्हटलं जात आहे.

राजीनामा मंजूर-

द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान मोदींचा राजीनामा मंजूर केला असून मोदी आतापासून काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

येत्या 8 तारखेला नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा येत्या 8 जूनला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नरेंद्र मोदी सत्ता स्थापनेसाठी दावा करण्याची शक्यता आहे. येत्या 8 जूनला रात्री 8 वाजता हा शपथ सोहळा होणार असल्याची माहिती समोर आलीये.

News Title : PM Narendra Modi to give resign

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यात राजकीय भूकंप, देवेंद्र फडणवीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

INDIA आघाडीत सहभागी होणार?, चंद्राबाबू नायडू यांनी स्पष्ट केली मोठी भूमिका

“काही पण करा फडणवीस साहेब, मायच्यान पवार साहेबांचा नाद करु नका”

इंडिया आघाडी करु शकते सत्तेवर दावा, देशात असा पालटू शकतो खेळ

“माझ्या नादी लागू नका, तुमचा कार्यक्रमच लावणार”; मनोज जरांगेंचा थेट इशारा