‘या’ तारखेला होणार शपथविधी, मोदी तिसऱ्यांदा होणार पंतप्रधान?

PM Narendra Modi | लोकसभेचे निकाल 04 जून रोजी जनतेच्या समोर आला आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपला सर्वात मोठा झटका बसल्याचं चित्र पहायला मिळत आहे. भाजपने 400 पारचा नारा दिला मात्र भाजपने पाहिलेलं हे स्वप्न, स्वप्नचं राहिलंय. दरम्यान, आता समोर आलेल्या महत्त्वाच्या बातमीध्ये मोदी सरकार पुन्हा एकदा पंतप्रधान होणार असल्याचं म्हटलं आहे.

कधी होणार शपथविधी?

04 जून रोजी लोकसभेचा निकाल लागला आणि भाजपने 400 पारचा नारा दिल्यानंतर NDA च्या 292 जागा निवडून आल्या तर INDIA च्या 234 जागा निवडून आल्या. महाराष्ट्रात भाजपला चांगलाच धक्का बसल्याने सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली. मात्र आता मोदी (PM Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

माध्यमांच्या माहितीनूसार 08 जून रोजी देशभरात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचं म्हटलं जात आहे. 08 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत.

मोदींनी दिली प्रतिक्रिया-

निकालानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. मोदी म्हणाले की, मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या समर्पण आणि अथक परिश्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास व्यक्त केला आहे.

News Title : PM Narendra Modi to take pm swearing

महत्त्वाच्या बातम्या-

“माझ्या नादी लागू नका, तुमचा कार्यक्रमच लावणार”; मनोज जरांगेंचा थेट इशारा

भाजपची धाकधूक वाढली! नितीश कुमारसोबत एकाच विमानाने ‘या’ नेत्याने गाठली दिल्ली

लोकसभा निकालावर शरद पोंक्षेंची पोस्ट, म्हणाले ‘हिंदूच…’

‘सरकारमध्ये येणार पण..’;चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांचं BJP वर दबावतंत्र, केली मोठी मागणी

मोठी बातमी! नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात