Top News देश

औरंगाबाद ट्रेन अपघातावर पंतप्रधान मोदींनी केला शोक व्यक्त

औरंगाबाद | मालवाहू ट्रेनखाली चिरडून 14 मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादजवळ घडली आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसंच मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

महाराष्ट्रातल्या औरंगाबादच्या जवळच्या ट्रेन अपघातात 16 मजुरांच्या मृत्येने मी व्यथित झालो आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी मी याप्रकरणी बोललो आहे. ते या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत, असं मोदी म्हणाले आहेत. आवश्यक त्या सगळी मदत आणि सहकार्य दिले जात असल्याचंही मोदी यांनी सांगितलं आहे.

लॉकडाऊनमुळे जालन्यात अडकलेले मजूर रेल्वे रुळावरुन औरंगाबादच्या दिशेने पायी येत होते. रात्री थकल्यानंतर त्यांनी रूळावर आसरा घेतला. मात्र पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास मालवाहू ट्रेनने त्यांना जागीच चिरडलं. या दुर्घटनेत 16 जणांचा जागीच जीव गेला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, हे परप्रांतीय मजूर मध्य प्रदेशातील होते. म.प्रदेश सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच मृतांचे पार्थिव एका विशेष विमानाने मध्य प्रदेशात नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यात गुरूवारी किती रूग्ण वाढले?; जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी

पुण्यात काल दिवसभरात विक्रमी 84 रूग्ण ठणठणीत होऊन घरी परतले!

महत्त्वाच्या बातम्या-

औरंगाबादच्या घटनेनं माझं मन सुन्न झालंय, रोहित पवार यांचं भावूक ट्विट

औरंगाबादजवळ काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; मालगाडीने 16 मजुरांना जागीच चिरडलं

महाराष्ट्रावरचा अन्याय तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही राजकारण करण्यास नालायक आहात- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या