देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधणार, काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 जूनला देशाला संबोधित करणार आहेत. एकीकडे भारतात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. तर दुसरीकडे भारत-चीनमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दोन्ही घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी नक्की काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

केंद्र सरकारकडून अनलॉक-2 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत कंटेनमेंट झोन वगळता इतर गोष्टींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय, रेड झोनमधले निर्बंध येत्या 31 जुलैपर्यंत कायम राहणार आहेत.

येत्या 1 जुलैपासून अनलॉक-2 चे नियम लागू होतील. टप्प्या-टप्प्याने देशात अनलॉकची प्रक्रिया राबवली जाईल, असं यात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, भारत-चीन सीमारेषा भागात तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून चीनच्या 59 अ‍ॅप वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यात कोरोनाचं थैमान, जिल्हाधिकाऱ्यांच्या डॉक्टरांना या महत्त्वाच्या सूचना

जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार, आरोग्यमंत्र्यांचा दावा

महत्वाच्या बातम्या-

भारताचा चीनला हिसका, टिकटॉकसह 59 अ‌ॅपवर बंदी

पुण्यात आजही नव्या कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ, दुसरीकडे डिस्चार्जची संख्याही मोठी

राज्यात आजही 5 हजारांहून अधिक नव्या रूग्णांची नोंद, जाणून घ्या आजची कोरोना आकडेवारी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या