बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पीएम केअर फंडात 2.51 लाख दिले, पण माझ्याच आईला बेड मिळवून देऊ शकलो नाही”

गांधीनगर | देशात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर गरीब आणि कामगार वर्गाचे फार हाल झाले. या संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतीचं आवाहन केलं होतं. यानंतर अनेकांनी पीएम केअर्स फंडात मदत केली. विजय पारेख यांनी देखील पीएम केअर्स फंडात 2.51 लाख रुपये जमा केले होते. मात्र त्यांच्या आईला बेड न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

धावपळ करूनही पारेख यांच्या आईला बेड मिळाला नाही. विजय पारेख यांनी त्यांची ही व्यथा ट्विटरवर सांगितली आहे. मी पीएम केअर फंडात 2.51 लाख रुपये जमा केले, पण मरणाच्या दारात असलेल्या माझ्या आईला बेड उपलब्ध झाला नाही, असं विजय पारेख यांनी सांगितलं आहे.

मला मार्गदर्शन करा की तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मी कुठे मदत करू, ज्यामुळे मला बेड मिळेल आणि मी कुणाला गमावणार नाही, असं पारेख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 10 जुलै 2020 रोजी 2.51  लाख रुपये जमा केल्याची पावतीही शेअर केली आहे. पारेख यांचं हे ट्वीट खूप व्हायरल होत आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

बीएमसीने काढलेल्या ‘या’ ग्लोबल टेंडरला एकूण 8 कंपन्यांचा प्रतिसाद पण…

स्वत: गर्भवती असूनही 9 महिने केली रुग्णांची सेवा, प्रसुतीवेळी कोरोनाने नर्सचा मृत्यू आणि….

“असं ऐकलंय की ट्विटरच्या चिमणीने 56 इंची पोपटाची हवा काढली”

ठाकरे सरकारचा मोठा आणि महत्वाचा निर्णय; ‘या’ दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश

‘या’ ठिकाणी सांडपाण्यात कोरोनाचा विषाणू मिळाल्यानं भीतीचं वातावरण!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More