पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 84 परदेश दौऱ्यांवर 2 हजार कोटींचा खर्च!

नवी दिल्ली |मागील साडेचार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर 280 मिलीयन डाॅलर म्हणजेच तब्बल 2 हजार कोटींचा खर्च झाला आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालाचा संदर्भ देत परराष्ट्र राज्यमंत्री वी. के. सिंह यांना संसदेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर विरोधक बऱ्याच वेळा टीका करताना दिसून येतात. मात्र आता मोदींच्या परदेश दौऱ्याबाबत ही नवी माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी मागील तीन वर्षांमध्ये तब्बल 3.4 लाख कि.मी. प्रवास केला आहे. मे 2014 मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदींनी जपान, अमेरिका, फ्रान्स, रशिया यासह आशियाई देशांचा दौरा केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

-माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला- नितीन गडकरी

-अबब!! इशा अंबानीच्या लग्नात चक्क अमिताभ आणि आमीर वाढपी

-संभाजी भिडे VS दलित पॅंथर: भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परनावगी नाकारली

-…ही तर आर्थिक दहशतवादाची सुरुवात; सामनातून RBI गव्हर्नर वादावर हल्लाबोल

-रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं- नितेश राणे