Loading...

“अच्छे दिनचं स्वप्न दाखवणाऱ्या मोदींनी कोणते दिवस आणलेत??”

मुंबई |  अच्छे दिनचं स्वप्न दाखवणाऱ्या मोदींनी कोणते दिवस आणलेत, असा प्रश्न पीएमसी बँकेच्या खातेदारांनी पंतप्रधान मोदींना केला आहे. आर्थिक अनियमितता आढळल्यानं अडचणीत सापडलेल्या पीएमसी बँकेच्या खातेदारांच्या शिष्टमंडळानं आज आरबीआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी 30 ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करू असं आश्वासन दिलं आहेे.

शिष्टमंडळानं दिलेल्या आश्वासनानंतर लवकर तोडगा काढण्याची मागणी पीएमसी बँकेच्या खातेदारांनी केली आहे. पीएमसी बँकेचे खातेदार काही दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत.

Loading...

निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असल्यानं याबद्दलचा निर्णय लगेच घेता येणं शक्य नसल्याचं आरबीआयने खातेदारांना सांगितलं. येत्या 25 आणि 27 तारखेला पीएमसी बँक प्रकरणी पुन्हा एकदा आरबीआयची बैठक होईल. त्यानंतर 30 तारखेला पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करण्यात येईल.

दरम्यान, पीएमसी बँकेच्या खातेदारांना सर्वोच्च न्यायालयाने देखील दिलासा दिलेला नाही. काही खातेदारांनी सुप्रिम कोर्टात धाव घेत जनहित याचिका दाखल केली होती. मात्र त्यावर सुनावणी घेण्यास न्यायालयानं नकार दिला.

Loading...

चंद्रकांत पाटलांची मनसेच्या किशोर शिंदेंना ऑफर; त्यावर शिंदे म्हणतात… 

महत्वाच्या बातम्या-

 

Loading...

 

 

Loading...