Top News विधानसभा निवडणूक 2019

“जे आपल्या कार्यकर्त्यांना मोठं होऊ देत नाहीत, ते तुमच्या मुलांना काय मोठं करणार?”

जळगाव | जे आपल्या कार्यकर्त्यांना मोठं होऊ देत नाहीत ते तुमच्या मुलांना काय मोठं करणार?, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. ते जळगावमध्ये आयोजित प्रचारसभेत बोलत होते.

आमच्या व्यासपीठावर युवा नेते बसलेले आहेत. त्यांच्याकडे एक कार्यकर्ता सेल्फी काढण्याासठी घुसला होता, मात्र दबदबा असलेल्या बड्या नेत्यानं त्याला चक्क कोपरानं ढकललं. जे आपल्या कार्यकर्त्यांना मोठे होऊ देत नाहीत ते तुमच्या मुलांना काय मोठं होऊ देणार?, असा सवाल नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना विचारला.

शरद पवार यांचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत शरद पवार आपल्याच एका कार्यकर्त्याला कोपराने ढकलताना दिसत आहे. याच व्हीडिओचा धागा पकडून नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

दरम्यान, याच सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीसह काँग्रेसवरही निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आज नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या