बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! महाराष्ट्र बंदमुळे पुण्यातील PMPML प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

पुणे | लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. महाराष्ट्रातून अनेक संघटनांनी या बंदला पाठींबा दिल्याचं पाहायला मिळत आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये व मेडीकल हे वगळून इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पुण्यातूनही या बंदला चांगला पाठींबा मिळाल्याचं दिसून येतंय. त्यातच पीएमपीएल सेवा दुपारी 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पीएमपीएल प्रशासनाने घेतला आहे.

त्यामुळे पुणे शहराची जिवनवाहीनी असलेली पीएमपीएल सेवा आज दुपारपर्यंत धावणार नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पीएमपीएल बसेस आज दुपारी 12 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पीएमपीएल प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे सुमारे 1400 बसेस आज बंद राहणार आहेत. या बंदमुळे रोज पीएमपीएलने प्रवास करणाऱ्या पुणेकरांना मात्र त्रास सहन करावा लागणार आहे. अनेक प्रवाशांना पीएमपीएल बंदची कल्पना नसल्याने प्रवाशांना ठराविक ठिकाणी पोहोचण्यात अडचणी आल्या आहेत.

महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची घोषणा केल्यानंतर पुणे शहरात जागोजागी जाऊन कार्यकर्त्यांनी सर्व सेवा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. तर कार्यकर्त्यांकडून पीएमपीएल डेपोवर जाउनही  बंदचे आवाहन करण्यात आले होते. याशिवाय पुण्यातील रस्त्यांवर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचा या बंदला पाठींबा आहे. या पक्षांच्या प्रतिनिधींनी 9 तारखेला पत्रकार परिषद घेऊन तशी माहिती दिली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रविवारी या बंद बाबत सांगितलं होतं. ते म्हणाले होते, आज रात्री पासून या प्रदेशव्यापी बंदला सुरूवात होईल. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यासाठी जागोजागी जाऊन नागरिकांना या बंदमध्ये सामिल होण्याचे आणि शेतकऱ्यांसोबत एकजुट दाखविण्याचे आवाहन करत आहेत. त्यानुसार नागरिकांकडूनही बंदला पाठींबा मिळाल्याचं दिसून आलंय.

 

थोडक्यात बातम्या-

राज्यातील प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे!

‘मी त्यालाही ओळखत नाही आणि कुठल्या अभिनेत्यालाही ओळखत नाही, पण…’

कोहलीने धोनीसाठी केलेल्या ‘या’ ट्विटची सोशल मीडियावर रंगलीये चर्चा

”प्रियंका गांधीला झाडू मारावी लागली त्यात महाविकास आघाडीला वाईट वाटायचं कारण काय?”

तो आला, त्यानं पाहिलं… अन् चौकार-षटकार मारुन पुन्हा जिंकून दिलं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More