बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

द बर्निंग बस! भर रस्त्यात बसने अचानक घेतला पेट अन्…

पुणे | पुणे जिल्ह्यात अनेक जण पीएमपीएमएलने प्रवास करत असतात. पुण्यात पीएमपीएमएलने  अचानक पेट घेतल्याने काही घटना घडल्या आहेत. त्यातच आता पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीएल बसने  अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. चालकाने प्रसंगावधान राखल्याने 30 प्रवासांचे प्राण वाचले असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.

पिंपळे गुरव येथून पुण्याच्या दिशेने बस जात होती त्यावेळेस दापोडी पुलावर अचानक धुर येऊ लागल्याने बस थांबवण्यात आली आणि प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. त्यानंतर काही मिनिटातच बसने पेट घेतला. यामध्ये चालकाने प्रसंगावधान राखल्याने प्रवाशांना कोणतीही हानी पोहचली नाही.

पिंपळे गुरव या ठिकाणाहून एमएच-12, एचबी 1438 सीएनजी ही बस पुण्याकडे जात होती. दरम्यान, बसच्या इंजिनमध्ये शॉटसर्किट होऊन धुर येत असल्याने चालक लक्ष्मण हजारे यांनी रस्त्याच्या कडेला  थांबवली. तात्काळ चालक आणि वाहक यांनी प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात धुर येऊन बसने पेट घेतला.

दरम्यान, ही घटना बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली आहे. येथे तात्काल अग्निशमन जवानांनी घटनेस्थळी येऊन आग नियंत्रणात आणली. पुणे आणि पिंपळे गुरव येथे दोन्ही ठिकाणी काही काळ वाहनांची गर्दी झाली होती.

थोडक्यात बातम्या- 

मी आजही हिंदूच, आईची इच्छा होती म्हणून मी…”

समीर वानखेडे यांचा निकाह लावून देणारे मौलाना आले समोर; केले ‘हे’ धक्कादायक खुलासे

देवेंद्र फडणवीसांच्या ‘या’ महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टला अखेर ठाकरे सरकारचा हिरवा कंदील

पंजाबमध्ये राजकीय खळबळ; अमरिंदरसिंग यांनी केली महत्त्वाची घोषणा

भाजपला मोठा धक्का! भाजपचे 22 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More