पुणे | पुणे पीएमपीएमच्या बस कंडक्टरने 8 तासांच्या एका शिपमध्ये 1 लाख 1 हजार 402 रूपयांची प्रवासी तिकीटं फाडण्याचा विक्रम केला आहे. ते भोसरी बीआरटी डेपोत काम करतात.
भोसरी बीआरटी डेपोतल्या कुंदन काळे यांनी हा विक्रम केला आहे. परवा(गुरूवार) 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधनची सुट्टी असल्याने बसने प्रवास करणाऱ्याची संख्या जास्त होती. यादिवशी आपल्या कामाचे कसब दाखवत त्यांनी हा विक्रम आपल्या नावे केला आहे.
कुंदन काळे यांनी गुरूवारी झालेलं तिकीटांचं कलेक्शन संबंधित अधिकाऱ्याकडे जमा केलं. त्यांची ही कामगिरी पाहून पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव आणि पीएमपीएमच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं.
दरम्यान, कुंदन काळे यांनी या आधीही एकदा 50 हजार, एकदा 55 हजारांच्या तिकीटांचं कलेक्शन केलं होतं. यावेळी तर त्यांनी विक्रमच केला, चक्क 1 लाख 1 हजार 402 रूपयांच्या तिकीटांचं कलेक्शन केलं.
महत्वाच्या बातम्या-
-रविंद्र जडेजाला ‘अर्जुन पुरस्कार’ तर दीपा मलिक बजरंग पुनिया यांना ‘खेलरत्न पुरस्कार’ जाहीर
-अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश
-भाजपचे जेष्ठ नेते अरूण जेटली उपचार घेत असलेल्या एम्स रूग्णालयात भीषण आग
-विधानसभा लढण्यावर एकनाथ खडसे म्हणतात…
-‘आमचं ठरलंय… जय महाराष्ट्र!’; रश्मी बागल शिवसेनेत प्रवेश करणार??
Comments are closed.