बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्याचा पंतप्रधानांचा पश्चिम बंगाल दौरा रद्द; ऑनलाइन रॅलीचे आयोजन

नवी दिल्ली | पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभेचं वारं वाहू लागलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या रॅली आणि सभांना बंगालमध्ये उधाण आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालमध्ये प्रचार दौऱ्यानिमित्त जाणार होते.

उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा असणारा प्रचार दौरा हा रद्द करण्यात आल्याची माहिती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून दिली आहे. त्याऐवजी आता उद्या व्हर्चुअल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी पाच वाजता सहभागी होतील.

देशामधील ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी आणि उपलब्धता वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज एक उच्चस्तरीय बैठक झाली. आरोग्य सुविधा केंद्रांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करण्याची गरज असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत व्यक्त केलं आहे.

भारतात सध्या कोरोना रुग्ण संख्येने जागतिक पातळीवरील उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये तब्बल 3 लाख 14 हजार 835 कोरोना बाधितांची नोंद झाली असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यातच पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुक सुरू आहे. आज बंगालमधील सहाव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालं आणि 26 एप्रिल रोजी सातव्या टप्प्यातील तसेच 29 एप्रिल रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

आज पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

खोटे उत्सव आणि रिकामी बडबड नकोय, देशाला उपाययोजना हव्यात- राहुल गांधी

18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी ‘या’ तारखेपासून सुरू होणार नोंदणी

प्रेयसीला भेटायला जायचं आहे, कोणतं स्टीकर लावू?; तरूणाच्या अजब सवालावर मुबंई पोलिसांचं भन्नाट उत्तर

‘अदर पुनावाला डाकू, पंतप्रधान मोदींनी त्यांची कंपनी ताब्यात घेतली पाहिजे’; भाजप आमदाराचं वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More