औरंगाबाद | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचे आरोप केले होते. त्यामुळे मुंडे चांगलेच अडचणीत आले होते. मात्र शर्मांनी आपली तक्रार मागे घेतल्याने हे प्रकरण आता शांत झालं आहे. मात्र अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तो विषय बऱ्यापैकी मागे पडलेला आहे. तरीही याच्यावर परत परत बोलावं लागू नये म्हणून तुम्ही आलाच आहात. तर सैद्धांतिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, तात्त्विकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं समर्थन मी कधीही करू शकत नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
कुठल्याही एका गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला किंवा कुटुंबात ज्यांचा काही दोष नाही, त्या कुटुंबातील मुलांना त्रास होतो. मी महिला बालकल्याण मंत्रीही राहिलेली आहे. मी महिला म्हणून या गोष्टीकडे संवेदनशीलतेने बघते. हा विषय कोणाचाही असता तरी त्याचं राजकीय भांडवल मी केलं नसतं. आणि आताही करणार नसल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, संवेदनशीलता दाखवून मीडियाने त्यांच्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन करत भविष्यात यासंबंधी निकाल लागणार असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे.
थोडक्या बातम्या-
शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट- रामदास आठवले
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा धिंगाणा; रोहित पवारांनी अर्ध्यावर सोडला कार्यक्रम
‘कोरोनाच्या नियमांचं पालन होत नाही जर कोरोना वाढला तर…’; शरद पवारांनी व्यक्त केली ‘ही’ भीती
मास्क है जरुरी!; आदित्य ठाकरेंनी ‘मास्क’ म्हणताच सेना आमदाराची उडाली त्रेधातिरपीट!
‘तुमच्या शक्तीचा उपयोग करुन मुलाचं मन वळवा’; शेतकऱ्याचं मोदींच्या आईला पत्र