PNB Customers Alert l पंजाब नॅशनल बँकेचे (PNB) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. देशातील तिसरी सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. जर तुम्ही या सूचनेकडे दुर्लक्ष केले तर तुमचे बँक खाते (Bank Account) आणि त्यातील व्यवहारांवर निर्बंध लागू शकतात.
पीएनबीने (PNB) आपल्या ग्राहकांना २३ जानेवारी २०२५ पूर्वी त्यांचे केवायसी (KYC) तपशील अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. बँकेने म्हटले आहे की, सर्व बँकिंग सेवांचा (Banking Services) विनाअडथळा लाभ घेण्यासाठी २३ जानेवारीपूर्वी केवायसी (KYC) अपडेट करणे अनिवार्य आहे.
काय आहे पीएनबी केवायसीची (PNB KYC) नियतकालिक अद्ययावतीकरण (Periodic Updation) धोरण? :
पीएनबीच्या (PNB) केवायसीच्या नियतकालिक अद्ययावतीकरण धोरणानुसार, बँक जोखीम-आधारित दृष्टिकोन (Risk-Based Approach) स्वीकारते. खाते उघडण्याच्या / शेवटच्या केवायसी (KYC) अद्ययावत करण्याच्या तारखेपासून, उच्च-जोखीम (High Risk) असलेल्या ग्राहकांसाठी दर दोन वर्षांनी किमान एकदा, मध्यम-जोखीम (Medium Risk) असलेल्या ग्राहकांसाठी दर आठ वर्षांनी एकदा आणि कमी-जोखीम (Low Risk) असलेल्या ग्राहकांसाठी दर दहा वर्षांनी एकदा केवायसी (KYC) अद्ययावत करणे आवश्यक आहे.
PNB Customers Alert l कोणासाठी केवायसी (KYC) अपडेट करणे अनिवार्य? :
ज्या ग्राहकांच्या खात्यांचे केवायसी (KYC) अद्ययावतीकरण ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत होणे आवश्यक होते, परंतु त्यांनी ते केले नाही, अशा ग्राहकांसाठी हे केवायसी अपडेट लागू आहे.
जर ग्राहकांनी २३ जानेवारीपूर्वी केवायसी (KYC) तपशील अपडेट केले नाहीत तर त्यांच्या बँक खात्यातील व्यवहारांवर निर्बंध लादले जाऊ शकतात. म्हणजेच, केवायसी (KYC) अपडेट न केल्यास ग्राहकांचे बँकेशी संबंधित अनेक महत्त्वाचे व्यवहार ठप्प होऊ शकतात.
काय करावे? :
जर तुम्ही पीएनबीचे (PNB) ग्राहक असाल आणि तुमचे केवायसी (KYC) ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत अपडेट करणे आवश्यक होते, तर २३ जानेवारी २०२५ पूर्वी ते त्वरित अपडेट करून घ्या. केवायसी अपडेट न केल्यास तुमच्या बँक खात्यावर अनेक निर्बंध लागू शकतात, ज्यामुळे तुमचे आर्थिक व्यवहार (Financial Transactions) रखडू शकतात.