बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता गॅस सिलेंडरच्या बुकिंगमध्ये वाचवा पैसे, कसं ते वाचा सविस्तर

नवी दिल्ली | देशात महागाई गगनाला भिडत आहे. सीएनजी, घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत नुकतीच वाढ झाली. आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीचा देखील पुन्हा एकदा भडका उडाला आहे. मात्र आता तुम्हाला गॅस सिलेंडरमध्ये काही पैसे वाचवण्याची संधी मिळणार आहे. पॉकेट वॉलेट ॲप तुम्हाला ती संधी देणार आहे.

पॉकेट ॲपद्वारे तुम्हाला LPG गॅस सिलेंडरवर कॅशबॅक दिला जाणार आहे. पॉकेट हे एक डिजीटल पेमेंट सुविधा देणारं ॲप आहे. तुम्ही जर गॅस सिलेंडर घेताना या ॲपद्वारे पेमेंट केलं तर तुम्हाला सिलेंडरच्या किंमतीच्या 10 टक्के म्हणजेच 50 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.

पॉकेट ॲपवर गॅस सिलेंडर खरेदी किंवा कोणत्याही इतर 200 रुपये आणि त्यापेक्षा जास्तच्या पेमेंटवर 10 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. शिवाय त्यासाठी कोणताही प्रोमो कोड टाकण्याची गरज पडणार नाही. ही ऑफर महिन्यातील तीन पेमेंट्सवरच मिळणार आहे.

यासाठी तुम्हाला पॉकेट ॲप डाउनलोड करून त्यातील वॉलेटमध्ये जावं लागणार आहे. त्यानंतर pay या पर्यायावर क्लिक करायचे आहे. तिथून एलपीजीच्या पर्यायावर जाऊन प्रोव्हायडर निवडून पेमेंट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कॅशबॅक दिला जाईल. त्यामुळे आता या महागाईच्या काळात तुम्हाला या ॲपद्वारे थोडेसे पैसे बचत करता येणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

पुण्यात डिझेलची शंभरी पार तर दुसरीकडे पुणेकरांचा रिक्षाप्रवासही महागला

अजित पवारांच्या नातेवाईकांकडे आयकर विभागाने जप्त केली तब्बल एवढ्या कोटींची बेहिशेबी मालमत्ता

पुढच्या वर्षी धोनी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार का? धोनीने दिलं हे उत्तर

“हिंदूहृदयसम्राटांचं भाषण म्हणजे असायची पर्वणी, आता मात्र सगळंच अळणी”

मोठी बातमी! आरोग्य विभागाच्या परिक्षेचा गोंधळ संपता संपेना, परिक्षा केंद्रावरून पुन्हा गोंधळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More