बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इकडे क्रांती रेडकर चिंतेत तर दुसरीकडे आठवलेंच्या कवितांची गाडी सुसाट

मु्ंबई | आरपीआयचे नेते रामदास आठवले आपल्या विनोदी शैलीतील कविंतामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी त्यांच्या कवितांनी अगदी संसदेतही हशा पिकवला होता. आता त्यांनी समीर वानखेडे यांना पाठींबा देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही तसाच हशा पिकवल्याचं पाहायला मिळालंय. त्यांच्या कवितांनी तणावात असलेल्या क्रांंती रेडकरांच्या चेहऱ्यावरही हसू फुललं होतं.

समीर वानखेडेंविरोधात नवाब मलिक यांनी आरोप केले आहेत. याच संदर्भात समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पाठींबा देण्यासाठी आठवलेही पत्रकार परिषदेला उपस्थित होते. पत्रकार परिषदेत क्रांती रेडकर यांनी नवाब मलिकांना समीर वानखेडेंवर लगावलेल्या आरोपांवरून खडे बोल सुनावले आहेत

मात्र, इकडे क्रांती नवाब मलिक यांच्यावर संताप व्यक्त  करत होत्या. तर तिकडे आठवलेंची कवितेची गाडी मात्र सुसाट धावतच होती. ज्यावेळी क्रांतीच्या सासऱ्यांनी नवाब मलिकांच्या भंगार व्यावसायाचा विषय काढला. तेव्हाही आठवलेंनी “तुम्ही नाही भंगार पण मी आहे अंगार” अशी कविता ऐकवली. त्यांच्या या कवितेने क्रांती यांनाही हसू आवरलं नाही.

एकंदरीतच रामदास आठवले यांनी तणावपूर्ण परिषदेचं रूपातंर हास्यमय वातावरणात बदलल्याचं दिसून आलं. त्यामुळे मागील काही दिवसांपासून चिंतेत असलेल्या क्रांती रेडकर आणि त्यांचे सासरे यांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळालं. दरम्यान क्रांती रेडकर यांना रामदास आठवले यांच्या सोबतच किरीट सोमय्या यांनी देखील पाठींबा दर्शविला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘तीन लोकांनी आमच्या घराची रेकी केली’, क्रांती रेडकरांचा गंभीर आरोप

सुपरस्टार रजनीकांत यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची अपडेट!

‘समीर वानखेडे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही’; रामदास आठवले वानखेडेंच्या पाठीशी

‘सर, बेइज्जती केली जातेय…’, अन् समीर वानखेडे वैतागून भडकले

पाकला बरबाद करणं आमचं पहिलं लक्ष्य; ‘या’ कारणांमुळे इसिस खुरासान गटाने दिला इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More