संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नका, नाहीतर… पोहरादेवीच्या महंतांचा थेट उद्धव ठाकरेंना इशारा
वाशिम | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात अनेक ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे भाजप नेते संजय राठोडांचा राजीनामा घेण्यात यावा यासाठी सरकारवर दबाव टाकण्यात येत आहे. मात्र, संजय राठोडांचा राजीनामा घेऊ नये, अशी विनंती पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांनी केली आहे.
महंत जितेंद्र महाराज यांनी ई-मेलद्वारे ही विनंती केली आहे. तसेच जर वनमंत्री संजय राठोड यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला तर पोहरादेवी गडावरून राठोड यांना शिवसेनेच्या आमदारकीचा ही राजीनामा द्यायला लावू, असा इशाराही यावेळी जितेंद्र महाराजांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पण विरोधकांनी या मुद्यावरून अधिवेशनात सरकारला घेरू नये यासाठी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याचं बोललं जातं आहे. तसेच सरकारने राठोडांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा आधीच विरोधकांनी सरकारला दिलाय.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र उद्धव ठाकरेंनी संजय राठोड यांना भेटणं टाळल्याचं पहायला मिळालं.
थोडक्यात बातम्या-
संजय राठोडांची विकेट पडल्यानंतर वनमंत्रिपद कुणाला?, ‘या’ नावांची जोरदार चर्चा
…म्हणून इमरान हाश्मीने दिला आलिया भट्टसोबत काम करण्यास नकार!
वनमंत्री संजय राठोड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली!
“शासन व समाज मुर्दाड बनलेत, पोलीस कधी नव्हे एवढे लाचार अन् लबाड झालेत”
दहावी-बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!
Comments are closed.