बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आकाशाकडे बोट दाखवत कोहली थेट रिषभ पंतवर भडकला; पाहा व्हिडीओ

मुंबई | सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. पहिल्या डावात भारताने के एल राहुल याच्या शतकीय खेळीच्या जोरावर 364 धावसंख्या उभी केली. त्याला प्रत्त्युतर देत इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने शतक ठोकत इंग्लंडने 391 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर आता भारताच्या दुसऱ्या डावात भारताने आतापर्यंत 6 बाद 181 धावा केल्या. सध्या रिषभ पंत आणि इशांत शर्मा मैदानात खेळत आहेत. त्यावेळी कर्णधार विराट कोहली रिषभ पंतवर भडकलेला दिसला.

भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा 80 व्या षटकात बाद झाला. त्यावेळी भारताची 175 वर 6 गडी बाद अशी धावसंख्या होती. चौथ्या दिवशीचा खेळ संपत आला होता. जडेजा बाद झाल्यानंतर इशांत शर्मा मैदानात खेळायला आला. त्यानंतर त्या दोघांनी 2ओव्हर खेळून काढल्या. परंतु दिवस मावळत आल्यानं सुर्यप्रकाश कमी होऊ लागला. मैदानात अंधार पडू लागला. तरीही पंत मैदानात खेळत होता.

अंधार पडायला सुरूवात झाली की कसोटी सामना थांबवण्यात येतो. त्या दिवसाचा खेळ थांबवण्यात येतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सामना पुढे खेळवला जातो. अंधार पडू लागला तरी रिषभ पंत मैदानात खेळतच होता. त्यामुळे विराट कोहली त्याला बालकनीतून हातवारे करत होता. मात्र रिषभचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. रिषभने कोहलीकडे बघितल्यानंतर कोहली पंतवर भडकला. ‘अंधार पडलाय खेळ थांबव’, असं कोहलीने पंतला खुणावलं.

दरम्यान, रोहित शर्माने देखील कोहलीच्या मागून खेळ थांबवण्यास सांगितलं. त्यानंतर रिषभ पंत आणि इशांत शर्माने मैदान सोडलं. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रिषभ पंत 14 धावांवर खेळत होता. तर इशांत शर्माने 4 धावा काढल्या होत्या. गेली दोन दिवस सामन्यावर इंग्लंडचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतंय. आज शेवटच्या दिवशी भारतीय गोलंदाजांवर भारतीय संघाची भिस्त असणार आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

चक्क खासदारच विसरले राष्ट्रगीत; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

देश सोडण्यासाठी अफगाणी नागरिकांची धडपड, विमानतळाचे फोटो पाहून हैराण व्हाल

15 ॲागस्टची सुट्टी ठरली दुर्देवी, मुलाच्या डोळ्यादेखत आईनं सोडला जीव

‘…म्हणून मला देश सोडावा लागला’; अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी सांगितलं कारण

आज राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More