Top News

धक्कादायक! पोलिसांकडूनच पोलिसाला आणि त्याच्या मुलीला बेदम मारहाण

हिंगोली | आपलं कर्तव्य बजावून औषध घेऊन घरी जाणाऱ्या जमादारासह त्याच्या मुलीस पोलिस अधिकाऱ्याने बेदम मारहाण केल्याची घटना हिंगोलीमधील नांदेड नाका येथे घडली आहे. त्यामुलीस डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला उपचारासाठी हिंगोली येथील शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हिंगोली जिल्हयातील कनेरगावनाका येथील चौकीमध्ये काम करत असलेले जमादार साहेबराव राठोड हे मधुमेहाच्या गोळ्या घेण्यासाठी हिंगोलीत आले होते. यावेळी मुलीसह घरी जात असताना नांदेडनाका भागात एका पोलिस अधिकाऱ्याने जमादार राठोड आणि प्रियंका राठोड यांना बेदम मारहाण केली.

राठोड यांनी मी पोलिस कर्मचारी असल्याचं सांगितल्यानंतरही त्यांना मारहाण सुरुच ठेवली. तर अधिकाऱ्यांनी प्रियंका यांनाही मारहाण केली. या मारहाणीत तिच्या डोक्याला काठी लागल्याने ती बेशुध्द झाली.

दरम्यान, या प्रकरणात आता वरिष्ठ अधिकारी काय भुमीका घेतात याकडे पोलिस खात्याचं लक्ष लागलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“ आईशपथ, मी संजय राऊत यांना प्लॅटफॉर्मवर पेटी वाजवताना पाहिलं होतं”

आरोग्यविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळणार 4 महिन्यांचा अ‍ॅडव्हान्स पगार

महत्वाच्या  बातम्या-

लष्कराची मदत घेण्याची वेळ येऊ देऊ नका- अजित पवा

मारहाण करुन पोलिसाचे हात दुखले; मुख्याध्यापकाला सांगितलं, लोकांना हाणा

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 124 वर; मुंबई-ठाण्यात नवे रुग्ण सापडले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या